Good News : सरकारची ‘ही’ कंपनी करणार 20 लाख स्टोव्ह आणि 1 कोटी पंख्यांचे वाटप

Ahmednagarlive24 office
Published:

Good News : सध्या विविध क्षेत्रांमध्ये विजेचा आणि एकंदरीत ऊर्जेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु उर्जा निर्मिती साधनांचा विचार केला तर त्यांचे साठे मर्यादित असल्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात ऊर्जा किंवा विज टंचाईची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ऊर्जा बचतीसाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत.

तसेच पर्यावरण पूरकता व स्वच्छ हवा व चांगल्या आरोग्य या दृष्टिकोनातून देखील या कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्या वातावरणाच्या दृष्टिकोनातून कार्बन उत्सर्जन ही एक मोठी समस्या असल्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत असल्याने कार्बन उत्सर्जनात घट हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन देखील यामागे आहे.

या माध्यमातून केंद्र सरकार काही कार्यक्रम हाती घेत असून त्यातीलच महत्त्वाचे दोन कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

केंद्र सरकार एक कोटी पंखे आणि वीस लाख इंडक्शन स्टोव्हचे करणार वाटप

ऊर्जा बचत व्हावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत व त्यामुळे केंद्र सरकारने आता दोन कार्यक्रम सुरू केले असून त्या अंतर्गत वीस लाख इंडक्शन स्टोव्ह आणि एक कोटी पंख्यांचे वाटप केले जाणार आहे.

हे वितरणाचे काम ईइएसएल म्हणजेच एनर्जी एफिशियन्सी सर्विसेस लिमिटेड या कंपनीकडून केले जाणार आहे. याकरिता कंपनीकडून फॅन प्रोग्राम आणि दक्ष कुकिंग प्रोग्राम सादर केला गेला आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील एक कोटी ऊर्जा कार्यक्षम म्हणजेच ब्रश लेस डायरेक्ट करंट पंखे आणि वीस लाख ऊर्जा कार्यक्षम असलेली इंडक्शन स्टोव्ह वितरित केले जाणार आहेत.

विजेची बचतीसाठी महत्त्वाचे आहेत हे इंडक्शन स्टोव्ह

हे स्टोव्ह पारंपारिक स्वयंपाकाच्या खर्चामध्ये 25 ते 30 टक्के बचत करण्यास मदत करतील. तसेच विजेची बचत आणि स्वयंपाकाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून देखील हे फायदेशीर आहेत. यास स्टोव्हच्या वितरणामागे स्वयंपाकाच्या पद्धती पर्यावरणाला पूरक अशा बनवणे व नागरिकांना स्वच्छ हवा व चांगल्या आरोग्य देणे हा आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीने इंडक्शन स्टोव्हचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा याकरिता मॉडर्न एनर्जी कुकिंग सर्व्हिसेस सोबत भागीदारी केली असून देशातील स्वयंपाक घरांमध्ये आधुनिक इलेक्ट्रिक स्वयंपाक उपकरणाच्या स्वीकृतीला यामुळे गती मिळण्याच्या अपेक्षा आहे.

सिलिंग पंखे करतील कार्बन उत्सर्जनात घट

तसेच या कार्यक्रमांमध्ये कमीत कमी ऊर्जेचा वापर करणारे सिलिंग पंखे वितरित करण्यात येणार आहेत. हे पंखे ऊर्जेचा वापर आणि पर्यावरणीय प्रभाव कमी करणार नाही तर विज बिल कमी करण्यासाठी देखील ते उपयुक्त ठरणार आहेत.

याबाबतीत सरकारचे म्हणणे आहे की 45 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जनात या पंख्यांच्या वापरामुळे घट होईल आणि बारा हजार मेगावॅट विजेची मागणी देखील कमी होण्यास मदत होईल असे देखील सरकारने म्हटले आहे. त्यामुळे वीज आणि ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय खूप महत्वपूर्ण सिद्ध होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe