Marathi News : पृथ्वीवर हिरे कोठून येतात हे अद्याप एक रहस्य आहे. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते, हिरे हे उल्का पिंडातून पृथ्वीवर आले तर काही शास्त्रज्ञांच्या मते हिरे पृथ्वीच्या गर्भात निर्माण झाले.
पृथ्वीशिवाय ब्रह्मांडात असे अनेक ग्रह आहेत, ज्याबद्दल मानवाला माहिती नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सूर्यमालेतही असे ग्रह आहेत जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो, त्यांच्याबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे.
नेपच्यून आणि युरेनस हे ग्रह आहेत जिथे हिरे आहेत. नेपच्यून पृथ्वीपेक्षा सुमारे १५ पट मोठा आहे, तर युरेनस पृथ्वीपेक्षा १७ पट मोठा आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ग्रहावर चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतो.
येथील वातावरण असे आहे की, येथे मोठ्या प्रमाणात हिरे तयार होतात. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांवर मिथेन वायू मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, मिथेनमध्ये हायड्रोजन आणि कार्बन असतात.
त्याचे रासायनिक सूत्र सीएच-४ आहे, जेव्हा नेपच्यून आणि युरेनसवर मिथेनचा दबाव येतो तेव्हा हायड्रोजन आणि कार्बनचे बंध तुटतात, त्यानंतर कार्बनचे हियामध्ये रूपांतर होते. त्यानंतर तिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो.
पण हा ग्रह पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, कारण इथली परिस्थिती अशी आहे की, पृथ्वीवरील कोणताही सजीव तेथे जगू शकत नाही. या ग्रहांवर जिवंत राहण्याची शक्यता शून्य आहे. कारण येथील तापमान तब्बल मायनस २०० अंश सेल्सिअसच्या खाली असते.