Health Tips : बदलत्या ऋतुमध्ये आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, मौसमी आजारांपासून राहाल लांब..!

Content Team
Published:
Food Items During Weather Change

Food Items During Weather Change : हळूहळू थडी वाढू लागली आहे. अशास्थितीत आहाराकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. कारण या मोसमात आजार लवकर होतात. थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते म्हणूनच सर्दी-खोकला यांसारखे आजार लगेच जाणवतात. म्हणूनच या मोसमात योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे.

बदलत्या ऋतूंमुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप आणि अनेक प्रकारचे मौसमी आजार सामान्य आहेत. अशा वातावरणात लोकांना त्यांच्या आरोग्याची आणखी जास्त काळजी घ्यावी लागते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील असा आहार घेणे फार गरजेचे आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असे काही पदार्थ आहेत जे या चढ-उताराच्या हंगामात होणाऱ्या आजारांपासून मुक्त होण्यास मदत करतात. ते कोणते चला जाणून घेऊया.

हळदीचे दूध

या बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध खूप फायदेशीर मानले जाते. हळदीमध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतात. याच्या सेवनाने शरीरातील मौसमी आजारांचा धोका कमी होतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हळद मिसळलेल्या दुधाचे नियमित सेवन करावे.

डाळिंब

बदलत्या हवामानासाठी डाळिंबाचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात.

संत्रा

संत्री देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बदलत्या ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून याने आराम मिळतो. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. त्यामुळे बदलत्या ऋतूत होणारे आजार दूर राहतात.

सफरचंद

मौसमी आजारांपासून आराम मिळवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. डॉक्टर देखील रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. जे शरीराला मजबूत ठेवतात, तसेच यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास मदत करते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच पचनक्रिया देखील सुधारते.

आले आणि मध

बदलत्या हवामानात स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी आले आणि मध खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी राहते. त्यामुळे सर्दी, खोकला इत्यादी मौसमी आजार होण्याची शक्यता कमी होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe