Benefits Of Mustard Seeds : मसाल्याच्या डब्यात आढळणारी छोटीशी मोहरी आरोग्यासाठी आहे वरदान ! वाचा फायदे…

Content Team
Published:
Benefits Of Mustard Seeds

Amazing Benefits Of Mustard Seeds : भारतातील प्रत्येक घरात मसाल्याच्या डब्यात आढळणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहरी. मोहरीचे नाव घेताच फोडणीची आठवण येते. मोहरीचा वापर हा प्रत्येक भाज्यांना फोडणी देण्यासाठी केला जातो. मोहरी नेहमी जिऱ्यासोबत वापरली जाते, पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या मोहरीचा आपल्या शरिरावर काय परिणाम होतो. किंवा त्याचे आपल्याला काय फायदे होतात. जर तुम्हाला माहित नसेल तर आज आम्ही त्याबद्दलचीच माहिती घेऊन आलो आहोत.

मोहरी दोन रंगांची असते, एक पिवळी आणि दुसरी तपकिरी. बहुतेक घरांमध्ये, तपकिरी रंगाची मोहरी वापरली जाते. मोहरीचे सेवन केल्याने कफ आणि पित्त दोष शांत होतो आणि शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होतात. मोहरी मध्ये फायबर, लोह, फॉस्फरस आणि प्रथिने यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. याच्या सेवनाने पचनसंस्थेशी संबंधित समस्या कमी होतात आणि मायग्रेनच्या समस्येपासूनही आराम मिळतो. चला यांच्या आणखी फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

-मोहरीचे सेवन केल्याने मायग्रेन सारख्या समस्यांमधून अराम मिळतो. याच्या सेवनाने वेदना कमी होण्यास मदत होते. रायबोफ्लेविन नावाचा घटक मोहरीच्या दाण्यामध्ये आढळतो, ज्यामुळे मायग्रेनचा धोका कमी होतो. मोहरीचे सेवन केल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो आणि लक्षणांपासून आराम मिळतो.

-मोहरीचे सेवन केल्याने दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो. यामध्ये सायनापिन नावाचे तत्व आढळते, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि ते निरोगी राहतात. मोहरीचे नियमित सेवन केल्याने दम्यापासून बचाव होतो.

-जर तुम्हालाही रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर आहारात मोहरीचा समावेश करा. मोहरीमध्ये मिथेनचा अर्क आढळतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि शरीर निरोगी राहते. मोहरीचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.

-मोहरीचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटीडायबेटिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी कमी करतात आणि शरीर निरोगी ठेवतात. मोहरीचे सेवन केल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.

-मोहरीचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास देखील फायदेशीर मानले जाते. त्याच्या सेवनाने चयापचय वेगवान होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. मोहरीच्या दाण्यामध्ये डायसिलग्लिसेरॉल नावाचा पदार्थ आढळतो, जो वजन कमी करण्यास मदत करतो आणि पोटाची चरबी देखील कमी करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe