Sun Transit : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला खूप महत्व आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर खूप परिणाम होतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम दिसून येतो. अशातच ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांची भूमिका देखील महत्त्वाची मानली जाते.
सूर्य हा ऊर्जा, आत्मा आणि पिता यांचा कारक मानला जातो, तर ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता, विवेक आणि वाणीचा कारक मानला जातो. प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेच्या अंतराने आपली राशी बदलत असल्याने नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या शेवटी सूर्य आणि बुध पुन्हा एकदा आपली राशी बदलणार आहेत.

अशातच27 नोव्हेंबरला बुध धनु राशीत प्रवेश करेल आणि 16 डिसेंबरला सूर्य देव धनु राशीत प्रवेश करेल. ज्याचा काही राशींवर परिणाम दिसून येणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह एकत्र असतात तेव्हा बुधादित्य योग तयार होतो आहे. बुधादित्य योग काही राशींसाठी खूप शुभ फळ घेऊन येणार आहे. आज आपण त्याच राशींबद्दल जाणून घेणार आहोत.
कुंभ
नोव्हेंबरच्या अखेरीस बुधाचे राशीत होणारे बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जात आहे. या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच मानसन्मान देखील मिळेल. व्यापार क्षेत्रात चांगला नफा मिळू शकतो. गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजार, सट्टेबाजी, लॉटरी यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एकूणच बुधादित्य योगाचा कुंभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे.
कन्या
ग्रहांचा अधिपती बुधाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जात आहे. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदीचा योग आहे. या काळात रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. करिअरसाठी हा काळ चांगला राहील, तसेच आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे.
मेष
बुध ग्रहाच्या राशीतील बदल वरदानापेक्षा कमी नाही. नशीब तुमच्या बाजूने असेल. योजनांमध्येही लाभ मिळेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. नोकरदारांसाठी काळ अनुकूल राहील.नोकरीच्या नवीन संधी आणि पदोन्नती मिळू शकते. करिअरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
धनु
सूर्याचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. या काळात कौटुंबिक, आर्थिक बाबी आणि वैयक्तिक विकासात अनुकूल परिणाम प्राप्त होतील. या काळात परदेशात करिअर करण्याच्या संधी मिळू शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल आणि चांगले फळ मिळते. या काळात धार्मिक कार्यात रुची वाढेल, ज्यामुळे मन शांत राहील. बुधाचे संक्रमण लोकांसाठी प्रगती आणि आर्थिक लाभाच्या संधी देखील घेऊन येईल.
मिथुन
2024 हे वर्ष खूप शुभ आणि फलदायी ठरू शकते. या काळात वैवाहिक जीवन आनंदी असू शकते आणि तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. त्याचबरोबर परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ मानला जात आहे. त्यांना समाजात मान-सन्मान मिळेल आणि कामात यश मिळेल.
मीन
2024 हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानले जात आहे. या काळात नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळू शकते. त्याच वेळी, नोकरदार लोकांना बदली आणि बढतीचा लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील, आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदीचा योग आहे.