Mars Rises : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांमध्ये मंगळाची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. जेव्हा-जेव्हा मंगळ आपली चाल बदलतो तेव्हा-तेव्हा त्याचा वाईट आणि चांगला परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. तसेच मंगळाला धैर्य आणि शौर्याचे कारक मानले जाते. मंगळ हे ऊर्जेचे प्रतीक असून, तो सूर्य, चंद्र आणि गुरूचा मित्र आहे तर बुध आणि केतू हे शत्रू मानले जातात.
शुक्र आणि शनि यांच्याशी त्यांचे संबंध तटस्थ आहेत. मकर राशीमध्ये मंगळ उच्च स्थानावर असला तरी कर्क राशीमध्ये तो दुर्बल मानला जातो. सध्या मंगळ अस्त अवस्थेत आहे आणि जानेवारी 2024 मध्ये त्याचा उदय होईल, ज्याचा परिणाम तीन राशींवर दिसून येणार आहे.
‘या’ 3 राशींना होईल फायदा !
मकर
मंगळाचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरू शकतो. या काळात आत्मविश्वास वाढेल, तसेच कामात यश मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते, या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदीचा योग आहे. जमीन, मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सर्व कामे पूर्ण करू शकाल.
मेष
2024 मध्ये मंगळाचा उदय राशीच्या लोकांसाठी शुभ ठरण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात, लोकांना नशिबाची साथ आणि त्यांच्या योजनांमध्ये यश मिळू शकते. संसाधने आणि उत्पन्न वाढू शकते. बेरोजगार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील, या काळात नोकरी आणि पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. 2024 हे वर्ष क्रीडा, पोलीस, लष्कर आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित लोकांसाठी चांगले ठरू शकते. याशिवाय वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. यावेळी, जमीन खरेदी-विक्रीतून फायदा होऊ शकतो.
धनु
2024 मध्ये मंगळाचा उदय राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जात आहे. या काळात धैर्य आणि शौर्य वाढेल. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या काळात उत्पन्नही वाढेल. नोकरदारांसाठी ते फलदायी ठरेल. या काळात मालमत्ता खरेदीचा देखील योग आहे.