Margashirsha Month : 28 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्व आहे. मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाला प्रिय मानला जातो. म्हणूनच या महिन्यात श्रीकृष्णाची आराधना केली तर अनेक समस्यांमधून मुक्ती मिळते. तसेच या काळात श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केली तर सर्व मोनोकामना देखील पूर्ण होतात.
दरम्यान, मार्गशीर्ष महिन्यात काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते. हे उपाय केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तसेच सर्व कामे मार्गी मागतात. आज आम्ही तुम्हाला याच उपायांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग…
मार्गशीर्ष महिन्यात करा या गोष्टींचे दान !
या काळात स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. या काळात चांदीची वस्तू दान केल्याने मुलांकडून आनंद मिळतो. तसेच आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी अन्नदान करणे खूप फायदेशीर मानले जाते. तसेच तुळशीचे रोप दान केल्याने देखील आर्थिक अडचणी दूर होतात. याशिवाय वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. या कालावधीत, उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
तुळशीची पूजा
मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची पूजा करावी. रोज सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावावा. सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पाणी अर्पण करावे.
शंखाची पूजा
मार्गशीर्ष महिन्यात शंखपूजा करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. पूजेनंतर गंगाजलाने शंख भरा आणि घरभर शिंपडा. असे केल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते. श्रीकृष्णाच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. संपत्ती आणि समृद्धी वाढते. रोग व दोष दूर होतात.
गीता पाठ करा
या काळात रोज गीता पठण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने श्रीकृष्णाची कृपा होते आणि जीवनातील संकटे दूर होतात.
या मंत्रांचा जप करा
रोजच्या पूजेच्या वेळी “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात. आयुष्यात येणारे अडथळे संपतात.