कार प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला जर कार घेण्याचा विचार असेल तर मग थोडं थांबा. कारण येत्या नवीन वर्षात नवीन भन्नाट कार लॉन्च होणार आहेत.
ऑटोमोबाईल क्षेत्रात आताच्या घडीला मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, किआ या उत्कृष्ट कंपन्या असून त्यांच्या कार जास्त प्रमाणात विकल्या जातात. म्हणजे या कार जास्त लोकप्रिय आहेत.
आता नवीन वर्षात 2024 च्या सुरूवातीलाच या कंपन्या आपले अनेक नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. नवीन वर्षात लॉन्च होणाऱ्या टॉप-5 कार विषयी व त्यांच्या फिचर्सविषयी जाणून घेऊयात
ह्युंदाई कंपनीची शानदार क्रेटा फेसलिफ्ट
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट ही शानदार कार आता ‘फुल टू भन्नाट’ अपडेटेड मध्ये येणार आहे. ही अपडेटेड कार 2024 च्या सुरुवातीला शोरूममध्ये दाखल होईल. ही मिडसाइज SUV असून आपली सेल वाढवण्यासाठी व लोकांत आपली क्रेझ निर्माण करण्याच्या हिशोबाने जबरदस्त व ऍडव्हन्स अपडेट फीचर्स सह येणार आहे. फ्रंट फॅसिआ आणि रियर एंड पूर्णपणे रिडिझाईन केलेलं आहेत. इंटीरियरमध्ये म्हणाल तर लेव्हल 2 ADAS सह अनेक नाविन्यपूर्ण अपडेट्स मिळतील.
यादीत दुसऱ्या क्रमांकावर किआ सोनेट फेसलिफ्ट
14 डिसेंबर रोजी Kia Sonet Facelift चे अनावरण होईल. त्यानंतर 2024 गमध्ये ती विक्रीसाठी उपलब्ध होईल. या कारच्या आत आणि बाहेर बरेच अपडेट्स केले गेले आहेत. ही कार लेटेस्ट ऑपोजिट यूनाइटेड डिजाइनवर आधारित असणार आहे. या कार ची स्टाईल एकदम बदलली आहे. बाहेरील लूक बदलला आहे तर कारमध्ये केबिनमध्ये एक नवीन टचस्क्रीन व कंट्रोलसाठी सुसज्ज यंत्रणा आहे. यात सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्ज असतील.
Mahindra प्रेमींसाठी देखील खुशखबर, येतेय XUV300
महिंद्राच्या कार प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. याचे कारण असे की, Mahindra 2024 मध्ये 5 नवीन कार लॉन्च करणार आहे. यामध्ये बहुप्रतीक्षित फेसलिफ्टेड XUV 300 आणि 5-डोर थारचा समावेश आहे. 2024 या नववर्षाच्या सुरुवातीला अपडेट केलेले XUV300 आणि XUV400 व्हर्जन बाजारात दाखल होतील. XUV 300 मध्ये मोठे बदल होण्याची अपेक्षा आहे. या पाच नवीन कारमुळे महिंद्राप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.
टाटा कंपनीची Curvv
Tata Curve या कारचे इलेक्ट्रिफाइड वर्जन आगामी वर्षात पाहायला मिळेल. त्यानंतर ICE मॉडेल येईल. त्यामुळे आगामी वर्षात ही एक भन्नाट कार कार प्रेमींचा भेटीला येणार आहे.