Marathi News : जगात जेवढे देश आहेत, त्यापेक्षा अधिक परंपरा आहेत. प्रत्येक देशात विविध जाती असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा असतात. इतर देशातील नागरिकांना त्या विचित्र वाटतात, पण त्या देशात याचे काटेकोर पालन होते, त्यांच्यासाठी त्या विशेष असतात.
मात्र काही परंपरा कुप्रथा असतात. अशाच प्रकारची एक कुप्रथा बांगलादेशातील मंडी जमातीतील लोकांत आहे. येथे आपल्याच मुलीशी लग्न करून एक बाप आपल्या मुलीचा नवरा बनतो. ही एक धक्कादायक परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे.
बांगलादेशाच्या मंडी जमातीतील ही विचित्र परंपरा असून ती कुप्रथेसारखीच आहे. येथे एखादा पुरुष कमी वयाच्या विधवा महिलेशी लग्न करतो, तेव्हा निश्चित करतात की पुढे चालून तो आपल्या मुलीशीच लग्न करेल.
मात्र महिलेला त्याच्यापासून झालेल्या मुलीशी नाही तर महिलेच्या पहिल्या लग्नानंतर झालेल्या मुलीशी लग्न करतो, नात्याने ती या व्यक्तीची सावत्र मुलगीच असते. यामुळे या परंपरेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होते.
कमी वयात मुलगी ज्या व्यक्तीला आपले वडील मानते, पुढे चालून त्यालाच आपला नवरा बनवते. या कुप्रथेचे कारण कोणतीही महिला कमी वयात विधवा होते आणि तिला मुलगी असते, तेव्हा याच अटीवर दुसऱ्या पुरुषाशी लग्न करते आणि पुढे चालून तिची मुलगी त्याच व्यक्तीची पत्नी बनते आणि पत्नी असल्याच्या सर्व जबाबदाऱ्या निभावते.
यानुसार सावत्र वडील, आपल्या सावत्र मुलीचा नवरा तर असतोच आणि तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवू शकतो. मात्र खरे वडील अशा प्रथांमध्ये सहभागी होत नाहीत. ही प्रथा महिला आणि तिच्या मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यासाठी आणि पुरुष त्यांचा सांभाळ करू शकेल यासाठी असल्याचे सांगितले जाते. आता ही कुप्रथा देशात कमी होत असली तरी, पण आजही या परंपरेचे पालन केले जाते.