The coldest place : हे आहे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण ! जिथे नैसर्गिक विधी होतात उघड्यावर आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी…

Published on -

The coldest place : सायबेरियाच्या एका टोकाला असलेल्या साखा रिपब्लिकमधील ओयमिखान हा जिल्हा पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण ठरत आहे. हिवाळ्यातले इथले तापमान उणे ५८ डिग्री सेल्सिअस होते आणि उन्हाळ्यातले तापमान शून्याजवळ पोहोचते.

रक्त गोठवणाऱ्या हिवाळ्यामुळे इथली लोकसंख्या कमी होत असून सध्या इथे ९०० नागरिक वास्तव्यास आहेत.

रशियातल्या याकुत्सक हा सर्वात थंड प्रदेश म्हणून आजवर ओळखला जायचा. मात्र याकुत्सकपासून दोन दिवसांच्या प्रवासानंतर येणाऱ्या ओखमियानने त्याचा हा दर्जा काढून घेतला.

ओखमियानचा अर्थ न गोठलेले पाणी. दोन अजस्र पर्वतांच्या कुशीत वसलेल्या या भागात वारे पोहोचतात ते अगदी शीत होऊन. १९२४ मध्ये इथला पारा उणे ७१.२ अंश सेल्सियसवर पोहोचला होता.

वाहिन्यातल्या पाण्याचा बर्फ होत असल्याने इथल्या घरात प्रसाधनगृहे नसतात. नैसर्गिक विधी उघड्यावर होतात. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बर्फ खोदून मग जमीन खोदावी लागते.

बर्फ सहजासहजी खोदला जात नाही. त्यासाठी त्यावर अगोदर मोठी शेकोटी करून बर्फ वितळवला जातो. गॅरेजमध्ये २४ तास हिटर सुरू ठेवला तरच कार सुरू होते. बाहेर नेल्यावर कार बंद करता येत नाही. ती बंद झाल्यास तिथेच तिला सोडण्याशिवाय पर्याय नसतो.

इथे स्मार्टफोनही फार कामाचा नसतो. बॅटरी काही मिनिटांतच डिस्चार्ज होते. या भागातून विमानांचे उड्डाणही होत नाही. काही जणांच्या लाळेचाही बर्फ होत असतो.

बर्फाचा झटका बसू नये यासाठी इथे सातत्याने हातपाय चालवावे लागतात. इथल्या नागरिकांच्या आहारात कच्च्या मांसाचा आणि माशांचा समावेश असतो. घोड्याचे काळीज इथे कच्चे खाल्ले जाते. इथे मांस खाण्याशिवाय पर्यायच नसतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe