Vastu Tips : हिंदू धर्मात ज्याप्रमाणे देवी-देवतांची पूजा केली जाते, त्याच प्रकारे झाडे आणि वनस्पतींचीही पूजा केली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक वनस्पतीचे एक वेगळे महत्व आहे. दरम्यान, आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून तुमची सुटका करेल.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अनेक प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये देवदेवता वास करतात. आज आपण ज्या वनस्पतीबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे शमी. शमीला भगवान शंकराची आवडती वनस्पती मानली जाते.
असे मानले जाते, घरामध्ये शमीचे रोप लावून सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. याशिवाय जीवनातील सर्व अडचणी देखील दूर होतात. आजच्या या लेखात आपण शमीचे झाड लावणे आणि त्याची पूजा करणे किती फायदेशीर आहे ते जाणून घेणार आहोत.
शमीच्या झाडाचे महत्त्व
भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांमध्ये शमीचे झाड महत्त्वाचे मानले जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार शमीचे झाड सर्व पापांचा नाश करते. शमी ही हिंदू देवी मानली जाते जिची विशेषत: दसरा सणादरम्यान पूजा केली जाते. दसरा सणाच्या दहाव्या दिवशी या झाडाची पूजा केली जाते. शमीच्या झाडाबाबत असेही म्हटले आहे की अर्जुनचे धनुष्य शमीच्या झाडापासून बनवले होते. भगवान राम आणि रावण यांच्या युद्धादरम्यान, भगवान रामाने शमी वृक्षाची पूजा केली ज्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला. धार्मिक मान्यतेनुसार ही वनस्पती तुळशीच्या रोपाइतकीच पवित्र मानली जाते. या वनस्पतीमध्ये शनीचे वास्तव्य आहे. त्यामुळे शनिवारी पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
हिंदू धर्मात शमीच्या झाडाला तुळशीच्या रोपाइतकेच महत्त्व आहे. तुळशीच्या रोपासोबत ते घरामध्ये लावल्याने सुख समृद्धी वाढते. शमीचे रोप तुळशीच्या कुंडीच्या उजव्या बाजूला ठेवावे. याशिवाय दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा आणि शमीच्या रोपाजवळ मोहरीचा दिवा लावावा. हे दोन दिवे रोज लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन-समृद्धीचे आशीर्वाद देते.
बऱ्याचदा रात्रंदिवस मेहनत करूनही स्वतःजवळ पैसे टिकत नाही. अशास्थितीत तुम्ही शनिवारी सकाळी लवकर उठून शमीच्या झाडाच्या मातीत एक सुपारी आणि एक नाणे गाडा. असे केल्यावर 7 दिवस रोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने, तुमची बचत सुरू होईल आणि तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरत असाल. खूप प्रयत्न करूनही कर्जमुक्ती होत नाही, तर अशा परिस्थितीत शमीच्या झाडाचा हा उपाय नक्की करून पाहा. शनिवारी काळे उडीद आणि काळे तीळ शमी वनस्पतीच्या सर्वात खालच्या ठिकाणी अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळेल आणि हळूहळू तुम्ही कर्ज फेडण्यास सक्षम व्हाल.