Benefits of Sunbathing in Winters : हिवाळा सुरु झाला आहे, थंडीच्या दिवसांमध्ये स्वतःला उबदार ठेवण्यासाठी लोकं अनेक उपाय करतात. कोणी उबदार कपडे घालतात तर काही गरम गोष्टींचे सेवन करतात तर काहीजण उन्हात बसून थंडीपासून स्वतःचे संरक्षण करतात. हिवाळ्याच्या दिवसात सूर्यकिरणं अंगावर घेणं आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. यामुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळतेच पण मन शांत राहण्यास आणि केसांची वाढ होण्यास देखील मदत होते.
तुम्ही हिवाळ्यात दररोज फक्त 10 मिनिटे सूर्यकिरणं अंगावर घेणं तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते, आज आपण याच्याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग…

हिवाळ्यात दररोज 10 मिनिटे सूर्यस्नान करण्याचे फायदे :-
-सूर्यप्रकाश रोज घेतल्यास शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे शरीर मजबूत राहण्यास मदत होते. यामुळे हाडेही मजबूत होतात. व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. विशेष म्हणजे व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते. या कारणास्तव, प्रत्येक व्यक्तीने दररोज सुमारे 10 मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा.
-हिवाळ्यात दररोज सकाळी सूर्यप्रकाश घेतल्यास तणाव कमी होण्यास मदत होते. खरं तर, सूर्यप्रकाशात खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी असते, ते नैराश्य आणि चिंताची लक्षणे दूर करण्यास मदत करते. या कारणास्तव, दररोज सूर्यप्रकाश घ्यावा.
-ज्या व्यक्तीला नीट झोप येत नाही त्याने दररोज सकाळी 10 मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा. खरं तर, सकाळी ताजे सूर्यप्रकाश घेतल्याने तणावाची पातळी कमी होते आणि चांगली झोप लागते.
-सकाळी घेतलेला सूर्यप्रकाश शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. सकाळची उर्जा हार्मोन वाढवून, तुम्ही दिवसभर चार्ज राहू शकता. यासाठी दररोज 10 मिनिटे सूर्यप्रकाश घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
-सूर्यकिरणांमुळे शरीरातील एंडोर्फिनची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.
-दररोज 10 मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्याने त्वचेच्या थरातील नायट्रिक ऑक्साईड सक्रिय होण्यास मदत होते. तसेच शरीरातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.
-इतकेच नाही तर सूर्यप्रकाशात असलेले व्हिटॅमिन डी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासही मदत करते. त्वचेवर कोणतेही लोशन किंवा तेल न लावता दररोज 10 मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्यास अनेक गंभीर आजार टाळता येतात.