Sore Throat : हिवाळ्याच्या हंगामात अनेक आजार शरीराला घेरतात. या मोसमात सर्दी, खोकला, फ्लू आणि विषाणूजन्य समस्यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. हिवाळ्यात या समस्या सामान्य आहेत. घसा खवखवणे देखील यापैकी एक आहे. अशा स्थितीत आपण अनेक औषधांचा वापर करतो. पण यामुळे देखील कधी-कधी अराम मिळत नाही.
अशा स्थितीत तुम्ही काही घरगुती उपयांचा अवलंब करू शकता, यांच्या वापराने तुमची यातून सुटका लवकर होईलच पण या घरगुती उपायांमुळे तुम्हाला इतरही अनेक फायदे होतील.

जर तुम्हाला हिवाळ्यात घसा खवखवण्याची समस्या असेल तर तुळस आणि आले असलेला चहा पिणे खूप फायदेशीर आहे. यासाठी 4-5 तुळशीची पाने आणि आले मिक्स करून पाण्यात चांगले उकळावे. याचे नियमित सेवन केल्यास घसादुखीपासून लवकर आराम मिळतो. तसेच यामुळे तुमची रोगप्रतिकाक शक्ती देखील मजबूत होईल, आणि या मोसमात तुम्ही कमी आजारी पडाल.
हिवाळ्यात घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी आणि मधाचा देखील वापर करू शकता. यासाठी तुम्हाला एक चतुर्थांश चमचे दालचिनी पावडर पाण्यात उकळवावी लागेल. हे पाणी निम्मे झाल्यावर त्यात मध टाका. याचा नियमित वापर केल्याने घसादुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.
हिवाळ्यात घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हळदयुक्त पाण्याचे देखील सेवन करू शकता. हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. याचे नियमित सेवन केल्यास घसादुखीपासून लवकर आराम मिळतो. तसेच इतरही फायदे जाणवतात.
मुळेठी आयुर्वेदात खूप फायदेशीर मानली जाते. घशातील समस्या दूर करण्यासाठी मुळेठी हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. तुम्ही रोज १ चमचा मुळेठी पावडर, मध गरम पाण्यात मिसळून घेतल्यावर काही वेळाने तुम्हाला लगेच आराम मिळेल.