Paper Cup Side Effects : भारतात प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही चहाने सुरु होते. भारतात मोठ्या प्रमाणात चहा प्रेमी आढळतात. बऱ्याचदा लोकं टपरी, कॅफे इत्यादींमध्ये जाऊन चहा किंवा कॉफीचे सेवन करणे पसंत करातात. बाहेर कामाला जाणारी लोकं मोठ्या प्रमाणात टपरीवर चहा पिणे पसंत करतात.
टपरी किंवा कॅफेमध्ये चहा किंवा कॉफी डिस्पोजेबल म्हणजेच कागदी कपमध्ये मिळतो. मात्र, या कपांमध्ये चहा किंवा कॉफी पिणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आजच्या या लेखात आपण कागदी कपामध्ये चहा पिण्याचे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत, चला तर मग…
कागदी कपमध्ये चहा पिण्याचे दुष्परिणाम !
-कागदापासून बनवलेले कप आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. पेपर कपमध्ये चहा टाकला की त्यातील रसायन विरघळते. आणि जेव्हा आपण तो चहा पितो तेव्हा ते तुमच्या पोटात जाते, ज्यामुळे अपचन आणि जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात.
-पेपर कप बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या रसायनांमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. त्यात आढळणारी रसायने काही वेळा कपमध्ये दीर्घकाळ स्थिर राहतात आणि जेव्हा ते गरम चहा किंवा कॉफीच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
-पेपर कपमध्ये चहा प्यायल्याने किडनीवर देखील परिणाम होतो. शरीरात जमा होणारे विषारी पदार्थ थेट किडनीवर परिणाम करतात. त्यामुळे भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या सर्व गोष्टी वेळीच लक्षात ठेवा आणि पेपर कपचा अतिवापर टाळा.