Morning Walk During Winter : थंडीत सकाळी चालायला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी !

Published on -

Morning Walk During Winter : रोज सकाळी मॉर्निंग वॉक करण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी चालणे सर्वोत्तम मार्ग मानला जातो. ज्यांना जिम जायला आवडत नाही, त्यांच्यासाठी मॉर्निंग वॉक सर्वोत्तम मार्ग मानला जातो. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबत अनेक आरोग्यदायी फायदे जाणवतात.

मॉर्निंग वॉक आपल्याला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यास मदत करते, यामुळे स्नायू मजबूत होतात. पण, मॉर्निंग वॉकसाठी काही नियम आहेत, जे पाळले पाहिजेत. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला फायद्यांऐवजी नुकसानच जाणवते.

मॉर्निंग वॉक नेहमी सूर्योदयानंतर करावा. सकाळी ८ पर्यंतचा वेळ मॉर्निंग वॉकसाठी चांगला मानला जातो. तरच तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होतो. मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊया…

मॉर्निंग वॉकचे फायदे :-

-हिवाळ्यात मॉर्निंग वॉक केल्याने ऊर्जा मिळण्यास मदत होते. हे त्या व्यक्तीला दिवसभर सक्रिय राहण्यास मदत करते.

-हिवाळ्यात मॉर्निंग वॉकच्या मदतीने मधुमेहाचा धोका कमी होतो. शरीरातील चरबी बर्न होते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.

-आजकाल बहुतेक लोक कामामुळे तणावात असतात. त्याच वेळी, जर तुम्ही हिवाळ्यात नियमित मॉर्निंग वॉक करत असाल तर ते मूड देखील सुधारण्यास मद्त करते आणि तुम्हाला प्रेरणा मिळते.

-मॉर्निंग वॉकमुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायू मजबूत होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

हिवाळ्यात सकाळी फिरायला जाण्यापूर्वी ‘या’ गीष्टींची काळजी घ्या !

-घरातून बाहेर पडण्यापूर्वी हातमोजे घाला आणि मफलर घ्यायला विसरू नका. यामुळे सकाळच्या वेळी थंडी जाणवण्याचा धोका कमी होतो.

-हिवाळ्यात जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी जाल तेव्हा मोजे आणि शूज घाला.

-हिवाळ्यात खुल्या उद्यानात फिरणे अधिक फायदेशीर आहे. मात्र, या दिवसांत सूर्य उगवल्यानंतरच फिरायला जावे.

-हिवाळ्यात, फिरायला जाण्यापूर्वी आणि चालणे संपल्यानंतर कोमट पाणी प्या. यामुळे शरीराचे तापमान सामान्य राहते.

-जर तुम्ही हिवाळ्यात पहिल्यांदा फिरायला जात असाल तर सुरुवातीच्या दिवसात फक्त 15 मिनिटे चाला. चालण्याची वेळ हळूहळू वाढवा.

मॉर्निंग वॉकसाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

सूर्योदयानंतरची वेळ मॉर्निंग वॉकसाठी योग्य मानली जाते. मात्र, थंडीच्या दिवसात तुम्ही सकाळी १० वाजेपर्यंत फिरू शकता.

मॉर्निंग वॉक किती वाजता करावा?

सध्या प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी झाली आहे. असे असूनही, तुमच्या आजूबाजूची हवा स्वच्छ आहे की नाही हे तुमच्या लक्षात येते का? स्वच्छ हवा असल्यास सकाळी ७ नंतर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडता येते.

सकाळी चालणे चांगले की रात्री?

तज्ज्ञांच्या मते रात्री चालण्यापेक्षा मॉर्निंग वॉक जास्त फायदेशीर आहे. सकाळी चालण्याने तुमचा दिवसभर उत्साह राहतो, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहते आणि मॉर्निंग वॉक देखील चरबी कमी करण्यास मदत करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe