Loknete Dattaji Patil Sahakari Bank : बँकेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि नाशिक अंतर्गत सध्या विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकरिता मुलखाती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि नाशिक अंतर्गत “डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी अर्जासह संबंधित पत्त्यावर कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर पदांच्या एकूण 08 जागा भरल्या जाणार असून, यासाठी शैक्षिणक पात्रता असणे देखील गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे :-
डेप्युटी जनरल मॅनेजर : किमान वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट)
मॅनेजर : किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर (ग्रॅज्युएट)
ऑफिसर : किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर (ग्रॅज्युएट)
ही भरती नाशिक येथे होत असून उमेदवारांनी लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलखात 16 जानेवारी 2024 रोजी घेतली जाणार आहे, या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाईट https://www.ldpbank.com/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखत 16 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-मुलखतीस येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.