Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठातील विविध पदांसाठी भरती सुरु, ताबडतोब ‘या’ लिंकद्वारे करा अर्ज !

Published on -

Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे. तरी उमेदवारांनी या भरती साठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करावेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “रजिस्ट्रार” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरतीसाठी अर्ज https://admin.unipune.ac.in/recruitment/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही वैधानिक विद्यापीठाच्या किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा UGC 7 पॉइंट स्केलमध्ये ‘B’ ची समकक्ष पदवी. पीएच.डी. पदवी. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

अर्ज ऑनलाईन सादर करायचा असून, अर्ज शुल्क 400/- रुपये इतके भरायचे आहेत, जर एखाद्या उमेदवाराने अर्ज शुल्क भरले नाही तर त्याचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही, लक्षात घ्या फक्त ४५ वर्षाच्या आतील उमेदवारच अर्ज करतील. भरती संबंधित आणखी माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट http://www.unipune.ac.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहीरत काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe