NIN Pune Bharti 2024 : जर नोकरीच्या शोधात असाल तर पुण्यात या ठिकाणी भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे, कुठे सुरु आहे ही भरती आणि कोणत्या पदांसाठी सुरु आहे जाणून घेऊया.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत सध्या “अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, फिजिओ थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, नेचर क्युअर थेरपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लॉन्ड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर (अया वॉर्ड मुलगा), केअरटेकर (वॉर्डन), ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता तुमच्याकडे फक्त एकच दिवस शिल्लक आहे, तरी उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.
अर्ज https://ninpune.co.in/#/session/signup या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, यासाठी अर्ज शुल्क देखील भरायचे आहेत, सामान्य आणि OBC अर्जदारांसाठी शुल्क 500/- रुपये आहेत तर SC, ST, EWS उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. या भरती विषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.ninpune.ayush.gov.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाहीत.
-उमेदवाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
-अर्जासह अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. कोणत्याही उमेदवाराने अर्ज शुल्क भरले नाही तर अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल.
-लक्षात घ्या एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.