India’s Longest Bridge : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अजूनही शेकडो प्रकल्पांची कामे संपूर्ण देशभरात सुरू आहेत. अशातच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वाधिक लांबीचा केबल-स्टेड पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारका येथे विकसित करण्यात आलेल्या भारतातील सर्वाधिक लांबीच्या केबल स्टेड पूलचे उद्घाटन करणार आहेत. या ब्रिजला सुदर्शन सेतू असे नाव देण्यात आले आहे. याचे उद्घाटन उद्या, 25 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले आहे.
जस की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचे लोकार्पण करण्यात आले होते. मुंबई येथील मुंबई ट्रांस हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू या प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण झाले आहे.
अटल सेतू हा अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. स्थापत्य अभियांत्रिकीचा हा उत्कृष्ट नमुना राजधानी मुंबईच्या वैभवात भर घालत आहे. विशेष म्हणजे यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास खूपच जलद झाला आहे.
या सागरी सेतूमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास देखील जलद झाला आहे. अशातच आता स्थापत्य अभियांत्रिकीचा आणखी एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जाणारा द्वारका येथील सुदर्शन सेतू देखील सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार अशी माहिती समोर आली आहे.
सुदर्शन पूल हा ओखा मुख्य भूभाग आणि बायत द्वारका बेटाला जोडतो. दरम्यान हा पूल तयार करण्यासाठी सुमारे 980 कोटी रुपये खर्च झालेत अशी माहिती समोर आली आहे. सुदर्शन सेतूची एकूण लांबी 2.32 किमी एवढी असून हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल म्हणून ओळखला जात आहे.
सुदर्शन पुलाची रचना अतिशय खास आहे. याच्या पदपथावर चालताना, येथे आलेल्या कृष्ण भक्तांना श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक वाचता येणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या ब्रिजवर भगवान कृष्णाची चित्रे सुद्धा पाहता येतील.
यामुळे द्वारका येथे भेट देणाऱ्यांना द्वारकाधीश श्रीकृष्णांचे जागोजागी दर्शन घेता येईल आणि यामुळे त्यांचा प्रवास सोयीचा होणार आहे. फूटपाथच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले असून, यातून एक मेगावाट वीजनिर्मिती होणार आहे.
या पुलाच्या बांधकामामुळे भाविकांना द्वारका ते बायत-द्वारका दरम्यान ये-जा करण्याची सोय होणार आहे. आधी इथे येणाऱ्या भाविकांना यासाठी बोटींचा वापर करावा लागत असे.
मात्र आता या पुलामुळे भाविकांचा हा प्रवास खूपच सोयीचा होणार आहे. हा पूल देवभूमी द्वारकेतील पर्यटकांमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून उदयास येईल अशी आशा प्राधिकरणाकडून व्यक्त केली जात आहे.