Punjab National Bank RD Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. काहीजण सोने, चांदी, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतं तर काहीजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला पसंती दाखवतात.
याशिवाय, काही लोक बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायला विशेष पसंती दाखवतात.
बँकेच्या RD मध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. मात्र येथून मिळणारा परतावा हा शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत काहीसा कमी असतो.
तथापि, कमी परतावा मिळत असला तरी देखील अनेकजण बँकेच्या आरडी योजनेत गुंतवणूक करायला पसंती दाखवतात. अशा परिस्थितीत आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण पंजाब नॅशनल बँकेत जर एखाद्या ग्राहकाने पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला किती रिटर्न मिळू शकतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेचे आरडीसाठीचे व्याजदर
बँकेचे आरडी योजना अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरते ज्यांना एकमुस्त रक्कम गुंतवता येणे अशक्य आहे. कारण की आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवली जाते.
या रकमेवर बँकेकडून व्याज दिले जाते. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून आरडीसाठी सात टक्के एवढे व्याजदर ठरवण्यात आले आहे.
यामुळे जर पीएनबी मध्ये एखाद्या ग्राहकाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर दोन लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.
त्यामध्ये एक लाख 80 हजार रुपये सदर व्यक्तीची मूळ रक्कम किंवा गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित अर्थातच 20 हजार 688 रुपये या रकमेचे व्याज राहणार आहे.
या योजनेतून मिळणारे व्याज हे गुंतवणूकदाराला मिळणारे रिटर्न म्हणून ओळखले जाते. तथापि, ग्राहकांनी इथे एक गोष्ट विशेष लक्षात घेतली पाहिजे पंजाब नॅशनल बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना आरडी योजनेसाठी 0.50 टक्के अधिकचे व्याजदर दिले जात आहे.