भारतात केव्हा सुरू होणार बुलेट ट्रेन ? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीख सांगितली

Tejas B Shelar
Published:
Bullet Train

Bullet Train : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे विमान आणि रस्ते वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याची फलश्रुती म्हणून भारतातील दळणवळण व्यवस्था मोठी मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरे तर, कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते.

हेच कारण आहे की, भारताने आपली दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले असून आतापर्यंत अनेक महत्त्वाची प्रकल्प पूर्ण झाली आहेत. रेल्वे वाहतुकीचा विचार केला असता रेल्वे वाहतूक मजबूत व्हावी यासाठी देशात नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत.

वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन देखील सुरू झाली आहे. एवढेच नाही तर 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम राहणाऱ्या बुलेट ट्रेनची देखील पायाभरणी झाली आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेनची पायाभरणी करण्यात आली आहे.

यामुळे या मार्गावर बुलेट ट्रेन केव्हा सुरू होणार हाच मोठा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. दरम्यान याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी माहिती समोर येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन केव्हा जाऊ शकते याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

कसा आहे भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ५०८ किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यात शंभर टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून सध्या स्थितीला या मार्गाच्या उभारणीचे काम सुरू आहे.

या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत डोंगरात बोगदे आणि नदीवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पा अंतर्गत मुंबईच्या बीकेसी येथे या मार्गावरील पहिले आणि एकमेव अंडरग्राउंड स्थानक विकसित केले जात आहे.

सध्या या स्थानकाचे जोरात काम सुरू आहे. तसेच या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांतर्गत मुंबईत समुद्राखालून 21 किमी लांबीचा बोगदा खणला जात आहे. विशेष म्हणजे याचा 7 किमीचा भाग ठाण्याच्या खाडी खालून जाणार आहे.

या बोगद्याचा पाण्याखालील सर्वात खोल बिंदू 56 मीटरवर असणार आहे. बोगद्याची रुंदी सुमारे 40 फूट इतकी राहणार आहे. यातून बुलेट ट्रेन दर ताशी 320 किमी वेगाने धावणार आहे.

दरम्यान याच प्रकल्पाची नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी पाहणी पूर्ण केली आहे. यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच बिलीमोरा ते सुरत हा 2026 पर्यंत सुरु होणार आहे.

निश्चितच या नियोजित वेळेत जर बुलेट ट्रेन धावली तर प्रवाशांना लवकरच बुलेट ट्रेन ने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe