राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक पुण्यात ! 50 कोटी खर्चून ‘या’ ठिकाणी तयार झाले दुमजली बस स्थानक, 2 मार्चला होणार उद्घाटन

Pune New Bus Station

Pune New Bus Station : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये पुण्यातील अनेक विकास प्रकल्पांचा समावेश आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी एका विकास प्रकल्पाची भेट मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बारामती येथे विकसित होत असलेले दोन मजली बस स्थानक आता पूर्णपणे बांधून तयार झाले आहे. यामुळे बारामती येथे ये-जा करणाऱ्या बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे राज्यातील असे एक अत्याधुनिक बसस्थानक आहे जे एअरपोर्टच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे. या बसस्थानकावर प्रवाशांना विमानतळावर ज्या ज्या सुविधा दिल्या जातात तशाच प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

पण, बारामतीकरांच्या माध्यमातून या बसस्थानकाचे केव्हा उद्घाटन होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. हे बस स्थानक पूर्णपणे बांधून तयार झाले असल्याने लवकरात लवकर याचे लोकार्पण होणे देखील आवश्यक आहे.

अशातच या दुमजली बस स्थानकासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या बसस्थानकाचे लोकार्पण दोन मार्च 2024 ला होणार आहे. याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बसस्थानकासाठी 50 कोटी रुपयांचा खर्च केला गेला आहे. हे राज्यातील सर्वात मोठे दोन मजली बसस्थानक राहणार आहे. या बसस्थानकावर एकाच वेळी 22 बसेस उभ्या राहू शकतात तसेच रात्री मुक्कामाला 80 बसेस उभ्या राहतील अशी माहिती समोर आली आहे.

या बसस्थानकात चालकांसाठी तसेच वाहकांसाठी विश्रामगृह राहणार आहे. बसस्थानकावर कॉन्फरन्स हॉल देखील बनवण्यात आला आहे. येथे उत्तम दर्जाचे कॅन्टीन विकसित करण्यात आले आहे. येथील स्वच्छतागृह सुद्धा खूपच उत्तम राहणार आहे.

येथे स्तनदा मातांसाठी स्वातंत्र्य कक्ष स्थापित करण्यात आला आहे. याशिवाय इतरही अनेक सोयी सुविधा या बसस्थानकावर उपलब्ध राहणार आहेत. दरम्यान दोन मार्चला बारामती येथील या भव्य बसस्थानकाचे तर उद्घाटन होणारच आहे शिवाय बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय व बारामतीतील पोलीस निवासस्थानाचे सुद्धा उद्घाटन संपन्न होणार अशी माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe