आजच्या जगात डिजिटल बदलांमुळे बातम्यांचं स्वरूप बदलत आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर लाईव्ह २४ ही बातम्यांची वेबसाइट गूगल न्यूज इनिशिएटिव्हच्या भारतीय भाषा कार्यक्रमात सहभागी होऊन आघाडीवर आली आहे. या कार्यक्रमामुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला डिजिटल क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे वाचकांची संख्या आणि त्यांचा वेबसाइटवरचा वेळ वाढण्यात मदत झाली आहे.
पहिली स्टेज: निवड आणि सल्लागाराची मदत
या प्रवासाला सुरुवात झाली GNI च्या भारतीय भाषा कार्यक्रमात अहमदनगर लाईव्ह २४ ची निवड होऊन. यामुळे Readwhere आणि Google News Initiative च्या तज्ज्ञांकडून सल्ला मिळाला. या सल्ल्यामुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला त्यांच्या वाचकांच्या गरजा आणि आवडीच्या अनुसार त्यांची वेबसाइट सुधारण्यासाठी मदत मिळाली.
मार्गदर्शन आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन
या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे टेक्नॉलॉजीवर आधारित मार्गदर्शन सत्र होते. या सत्रातून अहमदनगर लाईव्ह २४ च्या टीमला Google Analytics 4 (GA4), Google AdSense यासारख्या विषयांची माहिती मिळाली. यामुळे त्यांना वाचकांना काय हवं हे समजून घेण्यास मदत झाली
GNI इंडियन लँग्वेज प्रोग्रॅम जॉईन करण्याआधी न्यूज आर्टिकल बनविण्यासाठी आमच्या टीमचा खूप वेळ जायचा, बातमीचे हेडलाईन बनवण्यापासून ते समरी आणि इमेजपर्यन्त जास्त वेळ जात असल्याने ब्रेकिंग न्यूज अपडेट करण्यास वेळ व्हायचा,बातम्यांसाठी फिचर इमेजेस शोधायला तासोंतास खर्च व्हायचे त्याचबरोबर कॉपीराईट्स इमेजेस आणि बातमीला मॅच होणाऱ्या इमेजेस शोधण्यात आमच्या टीमचा बहुतांश वेळ जात असल्याने आमच्या कामावर प्रभाव पडायचा
GNI प्रोग्रॅम मध्ये Google Gemini आणि Vertex AI ची ओळख झाल्यानंतर आमच्या CMS मध्येच हे टूल्स आम्हाला उपलब्ध झाले, आणि आमच्या टीमचा न्यूज आर्टिकल्स बनविण्याचा वेग वाढला ज्यामुळे आम्ही अधिक आर्टिकल्स पब्लिश करू लागलो,यामुळे कंटेंट ऑप्टिमायझेशची प्रकिया खूप सोपी झाली.
“Imagen” वापरून Vertex AI च्या इमेज जनरेशन फीचरने आम्हाला फार मदत झाली, बातम्यांसाठी मॅच होणाऱ्या फिचर इमेज आता एका क्लिकवर मिळतात आणि कॉपीराइटची चिंता आता आम्हाला पडत नाही,
न्यूज आर्टिकल्स वर हाय क्वालिटी आणि रिलेटेड इमेजस वापरल्याने आमच्या बातम्या अधिक लोकापर्यंत पोहोचल्या आणि युजर्सच्या संख्येत देखील वाढ झाली
बातमी संदर्भातील किवर्डस आणि टॅग्स आणि त्याच बरोबर इमेज ऑप्टिमायझेशन सोपं झालं आहे, जनरेटिव्ह एआयने आमच्या न्यूज आर्टिकल्सची क्वालिटी वाढल्याने कंटेंट क्रिएशनची प्रोसेस खूप सुरळीत झाली आहे.
वाचकसंख्या आणि अनुभव
Mediology आणि Google News Initiative च्या मार्गदर्शनामुळे झालेल्या बदलांमुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला वाचकांची संख्या वाढण्यात मदत झाली. गूगल न्यूज इनिशिएटिव्हच्या मदतीमुळे अहमदनगर लाईव्ह २४ ची वेबसाइट आणि वाचकांचा अनुभव दोन्ही सुधारला आहे.
वाचकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढती वाचक संख्या हेच अहमदनगर लाईव्ह २४ च्या यशस्वी डिजिटल प्रगतीचे उदाहरण आहे. अखेरीस, गूगल न्यूज इनिशिएटिव्हच्या भारतीय भाषा कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला डिजिटल क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूप मदत मिळाली आहे.
रिझल्ट्स
GNI इंडियन लँग्वेज प्रोग्रॅम जॉईन करण्यानंतर Monthly Active Users मध्ये ४६% वाढ झाली असून Pageviews मध्ये ४०% वाढ झाली आहे. स्टोरी प्रोडक्शन वेळ ३० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी झाला आणि एका आठवड्यात तयार होणाऱ्या स्टोरींची संख्या १५० वर ३०० पर्यंत वाढली आहे. CMS मध्ये Google च्या Gemini आणि Vertex AI आधारित जनरेटिव्ह AI चे integration आमच्यासाठी गेम-चेंजर ठरले आहे.