Astrology : ग्रहांचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव दिसून येत असतो, जेव्हा ग्रह आपली हालचाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकनावर दिसून येतो. ग्रहांची स्थिती माणसाला धनी बनवते. पण कुंडलीत ग्रहांची खराब स्थिती आर्थिक संकटाला कारणीभूत ठरते. अशा स्थितीत तुम्ही कितीही मेहनत केली तरी देखील तुम्हाला यश मिळत नाही.
वैदिक ज्योतिषात ग्रहांचा सेनापती मंगळ हा धनीचा कारक मानला जातो. मंगळाच्या कमकुवत स्थितीमुळे केवळ आर्थिक समस्याच उद्भवत नाहीत तर शरीरातील ऊर्जा आणि आत्मविश्वासावरही परिणाम होतो. जेव्हा मंगळ 8व्या, 12व्या आणि 6व्या भावात असेल तेव्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय कुंडलीत काही ग्रहांसह चंद्र बसतो तेव्हाही कर्जबाजारी होण्याची स्थिती निर्माण होते. तसेच बुध आणि गुरूसोबत चंद्राचे मिलन देखील आर्थिक संकट आणते.

तुम्हीही अशाच संकटांचा सामना करत असाल तर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती कमकुवत असल्याचे दर्शवते, तुम्हालाही आर्थिक अडचणींचा समान करावा लागत असेल तर आज काही उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही या सगळ्यातून सुटका मिळवू शकता तसेच तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करू शकता.
आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी ‘हे’ उपाय करा!
-बुधवारी गणपतीची पूजा करा. बाप्पाला मोदक किंवा लाडू अर्पण करा. दुर्वा घास अर्पण करा.
-दररोज भगवान शिवाची पूजा करा. शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे.
-मंगळवारी हनुमानाची पूजा करा. हनुमान चालिसाचे किमान दोनदा पाठ करा.
-मंगळवारी उपवास ठेवा. मंगळाच्या मंत्रांचा जप करावा.
-मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करून सूर्याची पूजा करावी. लाल वस्तू दान करा.