Manoj Jarange Patil News : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा मुद्दा गरम आहे. सध्या यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना निवडणुकीत तिकीट मिळाल आहे ते उमेदवार आणि ज्यांना तिकीट मिळेल अशी आशा आहे ते सुद्धा उमेदवार आता प्रचाराला लागले आहेत.
अशातच मात्र आता मराठा आंदोलनाचे शिल्पकार मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. खरेतर निवडणुकीत मराठा समाजाचे मत नेहमीच निर्णायक भूमिका निभावतात.
यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आला असल्याने याचे परिणाम निवडणुकीच्या निकालावर देखील पाहायला मिळतील असे मत राजकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अन आंदोलनाच्या मुद्द्यावर विपक्ष आणि सरकार सावध पवित्रा ठेवून आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
पाटील यांनी नुकतीच बीड येथील परळी मध्ये संवाद बैठक घेतली होती. यावेळी बोलतांना ते म्हटलेत की, बीडसह राज्यात मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.
तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच यावर एकमत आहे का ? म्हणून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत, त्यामुळे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही त्यांच्याशी भांडणार आहोत. तसेच, गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर नोटीसा लावल्या जात असल्याचे आरोप यावेळी पाटील यांनी केले आहेत.
तसेच त्यांनी यावेळी अंतरवाली सराटी येथे 24 तारखेला महत्त्वाची बैठक होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच या बैठकीत मराठा समाजाच्या मताची काय ताकत असते हे दाखवण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे म्हटले आहे.
24 तारखेला होणाऱ्या बैठकीत 900 एकरावर सभा कुठे घ्यायची याबाबतची घोषणा केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय राहणार हे ठरवले जाणार आहे.
यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. पण ते चुकीच्या माणसाला भेटले असून, मी समाजाला दैवत मानतो, त्यामुळे मराठा समाजाने एकजूट दाखवावी. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नये असे आवाहन केले आहे.