Maharashtra Board Result Declare : गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या माध्यमातून बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये निकालाच्या वेगवेगळ्या तारखा देखील फिरत आहेत.
यामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत. नेमका निकाल कधी जाहीर होणार ? अशी विचारणा थेट शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केली जाऊ लागली आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून सोशल मीडियावर फिरत असलेल्या तारखांवर विश्वास ठेवू नका, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच निकालाची अधिकृत तारीख राज्य बोर्ड अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार असे देखील बोर्डाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान बोर्डाच्या माध्यमातून अजून निकालाची तारीख जाहीर झालेली नाहीये परंतु बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले गेले आहे.
मात्र अजून निकालाची तारीख ठरलेली नाही. एकंदरीत राज्य बोर्डाने अजून निकालाची तारीख ठरवलेली नाहीये परंतु मे महिन्याच्या अखेरपर्यंत दोन्ही वर्गांचे निकाल डिक्लेअर होण्याची दाट शक्यता आहे.
कधी झाल्या होत्या परीक्षा
बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत संपन्न झाली होती. बारावीची परीक्षा जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. दहावीच्या परीक्षेबाबत बोलायचं झालं तर एक मार्च ते 26 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
ही बोर्ड परीक्षा 17 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. दरम्यान या लाखो विद्यार्थ्यांचे निकालाकडे मोठे बारीक लक्ष असून राज्य बोर्डाने मे अखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे लवकरच या विद्यार्थ्यांची आतुरता संपणार आहे.
निकाल कसा पाहणार ?
महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल बघायचा आहे. https://mahresult.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल तेव्हा निकालाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या निकालाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आपल्या आईचे नाव टाकून आपला रिझल्ट पाहता येणार आहे.