4.70 लाखाच्या ‘या’ कारवर मिळतोय तब्बल 40 हजाराचा डिस्काउंट ! ऑफर फक्त ‘इतके’ दिवस चालणार, वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
Renault Car Discount May 2024

Renault Car Discount May 2024 : तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. प्रामुख्याने ज्यांना हॅचबॅक गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची राहणार आहे. कारण की ग्राहकांमध्ये लोकप्रिय अशा एका स्वस्त हॅचबॅक कारवर ४०००० चा डिस्काउंट दिला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Renault कंपनीने आपल्या लोकप्रिय Renault Kwid या हॅचबॅकवर ही डिस्काउंट ऑफर आणली आहे. यामुळे ग्राहकांना ही हॅचबॅक गाडी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

परिणामी जर तुम्हालाही ही गाडी आवडत असेल आणि ही गाडी खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही ही गाडी या चालू महिन्यात खरेदी करून या डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहात. ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक गाड्यांपैकी एक आहे.

ही गाडी ग्रामीण तसेच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. दरम्यान, या गाडीवर कंपनीने मे 2024 मध्ये Rs 40,000 पर्यंतचा डिस्काउंट ऑफर आणला आहे. या ऑफरमध्ये 15,000 रुपयांपर्यंत रोख सूट, 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी कॅश बेनिफिट यांचा समावेश आहे.

तथापि या डिस्काउंट ऑफर बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आता आपण Renault Kwid या गाडीचे फीचर्स आणि किमती बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गाडीचे इंजिन आणि फीचर्स कसे आहेत

Renault Kwid ही लोकप्रिय हॅचबॅक गाडी आहे. यामध्ये 1.0-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे की 68bhp ची कमाल पॉवर आणि 91Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. Renault Kwid ही 4 वेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांसाठी लाँच करण्यात आली आहे.

या गाडीच्या फीचर्स बाबत आणि इंटेरियर बाबत बोलायचं झालं तर या हॅचबॅक गाडीच्या आतील भागात, ग्राहकांना अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, मॅन्युअल एसी, इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल आणि ORVM सारखें भन्नाट पिक्चर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तसेच, या गाडीत सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस तंत्रज्ञान, मागील पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रॉनिक स्थिरता प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे प्रगत फीचर्स देखील आहेत.

किंमत किती आहे ?

Kwid ही मध्यमवर्गीय कुटुंबांना डोळ्यापुढे ठेवून डिझाईन करण्यात आलेली एक लोकप्रिय गाडी आहे. या गाडीची क्रेज मध्यमवर्गीय लोकांमध्ये खूपच अधिक आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या हॅचबॅक कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख एवढी आहे. तसेच या गाडीच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही 6.45 लाख एवढी ठेवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe