Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे. तुळस फक्त रोप नसून ती पवित्रता आणि पूजेचे प्रतीक मानली जाते. हे देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते, तेथे देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि तिचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो.
धार्मिक मान्यतांनुसार तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यासोबतच तुळशीच्या रोपाला आरोग्याचा खजिनाही मानले जाते. याच्या पानांचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
तुळशीच्या रोपाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर वायू प्रदूषण कमी करण्यात आणि पर्यावरण शुद्ध करण्यातही मदत होते. त्यामुळे प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात तुळशीचे रोप असणे आवश्यक आहे. पण तुळशीचे रोप लावण्याचे आणि त्याला पाणी घालण्याचे काही नियम आहेत, जे प्रत्येकाला माहित पाहिजे, आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत.
शास्त्रानुसार, रविवारचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी उपवास करते. यामुळे रविवारी तुळशीची पूजा आणि जल अर्पण करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचे व्रत मोडते आणि तिचा कोप होतो असे मानले जाते.
यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात, तसेच आर्थिक संकटांना देखील समोरे जावे लागते. व्यवसायात व्यत्यय आणि कौटुंबिक कलह देखील होतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये.
धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूने विश्रांतीसाठी रविवार निवडला होता आणि माता तुळशीने त्यांच्या सेवेत उपवास ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या व्रतामध्ये तुळशी माता पाणी स्वीकारत नाही त्यामुळे या दिवशी तिला पाणी देणे योग्य मानले जात नाही.