Maharashtra Politics : नाद खुळा ! कोण खासदार होणार? तुतारीसाठी पाटील भावंडांची ११ बुलेटची पैज

Ahmednagarlive24 office
Published:
politics

Maharashtra Politics : देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. महाराष्ट्रातही आज शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी असणारी भावनिक लाट, कांदा, दुधाचे पडलेले भाव, महागाई आदी मुद्दे सत्ताधाऱ्यांविरोधात गाजत आहेत.

तर सत्ताधाऱ्यांनी देखील परफेक्ट नियोजन करत निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा काही टाईट फाईट आहेत की तेथे कोण खासदार होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सध्या एका गोष्टीची मीडियात चांगली चर्चा रंगलीय ती म्हणजे पाटील भावंडांच्या ११ बुलेटच्या पैजेची.

त्याचे असे आहे, माढ्याचा खासदार कोण होणार? याबाबत चक्क ११ बुलेटची पैज लागलीय. मोहिते पाटील यांचे समर्थक आणि माढा तालुक्यातील पाटील आडनावाच्या युवा शेतकरी भावंडांनी माढ्यातून तुतारीच (मोहिते पाटीलच) दिल्लीत पोहोचणार, असा दावा करत भाजपसह समर्थकांना ११ बुलेटच्या पैजेचे चॅलेंज दिले आहे.

हे चॅलेंज भाजपसह रणजितसिंह निंबाळकराच्या समर्थकांकडून अद्याप तरी स्वीकारलेले नाही. ते कोण स्वीकारणार का ? हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील, तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये लढत झाली. दोघांमध्ये झालेल्या लढतीमध्ये खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडली जाणार हे पाहावे लागणार आहे.

पैजेसाठी पुढे याल तर नोटरी करून शोरूमला पैसे भरणार
एका बुलेटची किंमत सुमारे पावणेतीन लाख असून ११ बुलेटची किंमत ३० लाख २५ हजार इतकी आहे. पैजेसाठी समोर कोण आले तर शोरूमला पैसे भरून नोटरी केली जाणार आहे. मोहिते पाटील समर्थकांचे चॅलेंज स्वीकारून जो कुणी शर्यत लावेल अथवा पैज स्वीकारेन त्याने माझ्यासोबत बुलेटच्या शोरूममध्ये यावे.

दोघेही गाड्या बुकिंग करून पैसे भरतील. जो विजेता ठरेल तो ११ बुलेटची शर्यत जिंकेल, असे या दोन्ही भावंडानी सांगितले असल्याची माहिती एका मीडियाने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe