नवीन घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टीलचे दर आले निम्म्यावर ; आताच चेक करा नवीन दर

Published on -

Steel Rate In June 2024 : सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे. यामुळे अनेक लोक घराचे बांधकाम थांबवतात. मात्र, जर तुम्ही या पावसाळी सीझनमध्ये घराचे काम करणार असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण की, या पावसाळी सीझनमध्ये तुमच्या घराचे काम स्वस्तात पूर्ण होऊ शकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात सध्या स्टीलचे भाव पावसाळी सीजन मुळे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

मान्सून सीझनमध्ये दरवर्षी बांधकाम साहित्यांच्या मागणीत घट येत असते. स्टीलच्या मागणीमध्ये देखील दरवर्षी मानसून काळात मोठी घट पाहायला मिळते. यंदा देखील तशीच परिस्थिती तयार झाली असून स्टीलचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

पावसाळ्याच्या सिजनमध्ये अनेक लोक घरांचे बांधकाम काढत नाहीत. पावसाळी काळात बांधकामात व्यत्यय येतो. या काळात पाणी मारण्याचे अतिरिक्त श्रम व पाणी वाचत असले तरी, पावसामुळे बांधकामात व्यत्यय येत असल्याने या काळात बहुतांशी लोक घराचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम थांबवतात.

साहजिकचं, बांधकाम कमी प्रमाणात होत असल्याने बांधकाम साहित्यांची मागणीही कमी होत असते. खरेतर, गेल्या काही दिवंसापासून स्टील म्हणजे बांधकामासाठी लागणार्या लोखंडी सळयांचे दर गगनाला भिडले होते. परंतु आता मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

स्टीलचे दर आता चक्क निम्म्यावर आले आहेत. यामुळे बांधकाम काढण्यासाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.  यामुळे बांधकाम क्षेत्रातील तज्ञांकडून घराचे काम काढण्यासाठी हा काळ सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जात आहे. सरकारच्या काही प्रयत्नांमुळे आणि हंगामी घटकांमुळे स्टीलचे भाव कमी झाले आहेत.

त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन घर बांधू इच्छिणाऱ्यांना स्वस्तात आपले घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. दरम्यान आता आपण सध्या स्थितीला स्टीलचे भाव काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. देशातील प्रमुख शहरांमध्ये सध्याचे लोखंडी सळ्यांचे अर्थातच स्टीलचे दर कसे आहेत? या विषयी माहिती पाहणार आहोत. 

देशातील प्रमुख शहरांमधील स्टीलचे सध्याचे दर खालील प्रमाणे 

कानपूर – 36000

रायपूर – 43000

रायगड – 42300

दुर्गापूर – 43100

कोलकाता – 43600

गोवा – 48600

इंदोर – 47500

जालना महाराष्ट्र – 47700

मुंबई महाराष्ट्र – 48800

नागपूर – 48200

(वर सांगितलेले दर हे TMP 12 mm लोखंडाचे दर आहेत)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe