Numerology : प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाशी संबंधित कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल तर ती ज्योतिषशास्त्राद्वारे जाणून घेता येते. ज्योतिषशास्त्रात राशी चिन्हासह, कुंडलीत उपस्थित ग्रहांची स्थिती आणि त्यांचा प्रभाव, या सर्वांची गणना करून भविष्याविषयी माहिती दिली जाते.
ज्योतिषशास्त्रा व्यतिरिक्त आपण अंकशास्त्राच्या मदतीने देखील व्यक्तीबद्दल खूप काही जाणून घेऊ शकतो. अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून तिच्याबद्दलची माहिती दिली जाते. यामध्ये 1 ते 9 या दरम्यान अंकांचा समावेश असतो.
अंकशास्त्रात जन्मतारखेचे अंक जोडून एक मूलांक संख्या मिळवली जाते. या सर्व संख्या नऊ ग्रहांशी संबंधित आहेत जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर खोलवर प्रभाव टाकतात. कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे, त्याचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे आहे आणि त्याला आयुष्यात कोणत्या परिस्थितींना सामोरे जावे लागणार आहे हे सहज कळू शकते. आज आपण अशाच काही खास तारखांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग…
मूलांक क्रमांक 1
महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 1 असते. ही संख्या जन्मतारखेची बेरीज करून काढली जाते. आज आपण या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत.
-मूलांक क्रमांक 1 असलेले लोक खूप भाग्यवान असतात. नशीब त्यांना नेहमीच साथ देते.
-या लोकांना नशिबाने एवढी कृपा मिळते की ते गरीबातून राजा होतात.
-हे लोक त्यांच्या कारकिर्दीत सरकारी अधिकारी आणि राजकारणी म्हणून उदयास येतात.
-या लोकांचे मन चांगले असते पण ते स्वभावाने थोडे हट्टी असतात.
-एकदा का त्यांच्या मनात काही करायचे ठरवले की ते पूर्ण करूनच ते मानतात.