Maruti Suzuki Car Discount Offer : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ज्यांना मारुती सुझुकीची सेडान कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. खरे तर मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक सेडान कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
SUV कार्सचा गेल्या काही वर्षांमध्ये दबदबा वाढलेला असतानाही कंपनीच्या सेडान कार ग्राहकांच्या पसंतीस खऱ्या उतरत आहेत. सियाझ ही कंपनीची अशीच एक लोकप्रिय सेडान कार आहे. कंपनीची ही लोकप्रिय कार एकेकाळी सेडान सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी कार होती.
या गाडीने अनेक वर्ष ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे असे म्हटले तर कदापी वावगे ठरणार नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत या कार्सच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
या सेगमेंटमध्ये बरेच बदल सुद्धा झाले आहेत. दरम्यान आता मारुती सुझुकी कंपनीने एक मास्टरस्ट्रोक लगावला आहे. कंपनीने या लोकप्रिय गाडीच्या विक्रीत वाढ व्हावी यासाठी एक मोठी डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत.
तसेच कंपनीच्या या निर्णयामुळे या गाडीच्या विक्रीत पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ शकते अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता आपण कंपनी Ciaz वर किती डिस्काउंट ऑफर करत आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कशी आहे मारुती सुझुकीची डिस्काउंट ऑफर ?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारुति सियाज (सिग्मा / डेल्टा) कारवर जास्तीत जास्त 48 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या डिस्काउंट ऑफर मध्ये कॅश डिस्काउंट म्हणून पंधरा हजार रुपये, एक्सचेंज बोनस म्हणून पंचवीस हजार रुपये किंवा स्क्रॅपेज म्हणून तीस हजार रुपये, कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून तीन हजार रुपये असे जास्तीत जास्त 48 हजार रुपये डिस्काउंट म्हणून मिळणार आहेत.
एक्सचेंज बोनस किंवा स्क्रॅपेज यापैकी कोणत्यातरी एकाच ऑफरचा लाभ मिळणार आहे. तसेच मारुति नेक्सा सियाज (जेटा/अल्फा) या कारवर कमाल 45 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या कारवर कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार नाही. बाकी ऑफर मारुति सियाज (सिग्मा / डेल्टा) सारखीच राहणार आहे.