Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अक्षरशः पूरस्थिती तयार झाली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस समवेतच डाळिंब सारख्या फळ पिकांचे देखील या पावसाने खूपच मोठे नुकसान झाले आहे.
म्हणून आता पावसाचा जोर कधी कमी होणार हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान याच संदर्भात आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक मोठी माहिती दिली आहे. पंजाब रावांनी 11 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. आज 11 ऑगस्टला राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र उद्यापासून म्हणजेच 12 ऑगस्ट पासून ते 19 ऑगस्ट पर्यंत राज्यात कडक सूर्यदर्शन होणार आहे.
हे पण वाचा : पंजाबरावांच मोठ भाकीत ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात सूर्यदर्शन, पाऊस विश्रांती घेणार
कस राहील महाराष्ट्रातील हवामान ?
या कालावधीत राज्यातील चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. खरे तर सध्या डाळिंब पिकासाठी सूर्यदर्शनाची आवश्यकता आहे.
सततच्या पावसाने डाळिंब पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट तयार झाले आहेत. यामुळे डाळिंब पिकासाठी सूर्यदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. तसेच, राज्यातील अनेक भागांमध्ये मूग पिक काढण्यासाठी तयार झाले आहे. यामुळे मूग पिकाची हार्वेस्टिंग करण्यासाठी देखील हवामान कोरडे असणे गरजेचे आहे.
हे पण वाचा : ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कसा राहणार पाऊस ? कुठं पडणार मुसळधार ?
दरम्यान आता याच शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी गोड बातमी दिली आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे 19 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सूर्यदर्शनाची शक्यता आहे. मात्र असे असले तरी राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये 17 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे.
तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागांमध्ये देखील 17 तारखेपर्यंत पावसाच्या सरी बरसत राहणार आहेत. 19 ऑगस्ट नंतर मात्र हवामानात मोठा बदल होणार आहे. पंजाबरावांच्या मते 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर तयार होणार आहेत.
या बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. यामुळे 19 ऑगस्टपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत असे आवाहन पंजाबरावांनी केले आहे.
हे पण वाचा : पंजाबराव डख यांचा तातडीचा मॅसेज ! पुन्हा एकदा महाराष्ट्रात बरसेल पाऊस…
ऑगस्ट महिन्यात खरंच पावसाचा खंड पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टचं सांगितलं