Upcoming Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून इलेक्ट्रिक गाड्यांना चांगली पसंती मिळू लागली आहे. यामुळे आता आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चर करण्यावर विशेष भर देत आहेत. तथापि सध्या भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचं बॉस आहे.
टाटाचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ खूपच स्ट्रॉंग आहे. सध्या तरी मार्केट मध्ये टाटाला कोणीच टफ फाईट देत नसल्याचे दिसतय. पण, इतर कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक सेगमेंट कडे विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळे आगामी काळात टाटा कंपनीला नक्कीच मोठे आव्हान मिळणार आहे.
अशातच MG Motor India लवकरच मार्केटमध्ये एक मोठा धमाका करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनी 11 सप्टेंबरला भारतात नवीन इलेक्ट्रिक कार Windsor लाँच करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
सध्या ही कार इंडोनेशिया आणि इतर काही देशांमध्ये क्लाउड ईव्ही या नावाने विकली जात आहे, परंतु भारतात ती विंडसर ईव्ही म्हणून सादर केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या अपकमिंग इलेक्ट्रिक कारची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असतील फिचर्स ?
MG कंपनीची आगामी Windsor EV मध्ये 37.9kWh आणि 50.6kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध करून दिले जाणार असा अंदाज आहे. 37.9kWh बॅटरी पॅक असणारी कार 360 किलोमीटर आणि 50.6kWh बॅटरी पॅक असणारी कार 407 किलोमीटर एवढी ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असणार असा दावा केला जात आहे.
ही कार समोरच्या एक्सलवर बसवलेल्या कायम चुंबकीय सिंक्रोनस मोटरद्वारे चालविली जाईल, जी 134hp ची शक्ती देते. पण, भारतात कोणता बॅटरी पॅक उपलब्ध असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विंडसर ईव्ही ही मोठ्या हॅचबॅक आणि एमपीव्हीचे मिश्रण राहणार आहे.
या कारची लांबी अंदाजे 4.3 मीटर एवढी राहणार आहे आणि व्हीलबेस 2,700 मिमीचा राहील. कारची स्थिती आणि आकार MPV सारखा आहे, परंतु ती केवळ 5-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल असे मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.
या गाडीचे इंटेरियर खूपच प्रीमियम राहील असे म्हटले जात आहे. या गाडीच्या आतमध्ये एक मोठी फ्लोटिंग टचस्क्रीन मिळेल, ज्यामध्ये खूप कमी फिजिकल स्विचेस असतील. कारमध्ये रीयर AC व्हेंट्स, 3-पॅसेंजर रियर सीट असतील.
गाडीची किंमत किती असेल?
एमजी कंपनीच्या या आगामी इलेक्ट्रिक कारची किंमत वीस लाख रुपयांपेक्षा कमी राहिल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. तथापि, या गाडीची किंमत नेमकी किती राहणार यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. पण, ही गाडी टाटा आणि महिंद्रा कंपनीच्या 20 लाखाच्या आत असणाऱ्या गाड्यांसोबत स्पर्धा करणार असे म्हटले जात आहे.