श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा ! किंमतीत मोठी घसरण, आजचे दर लगेचच चेक करा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कालावधीत सोने-चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी दिलासादायक राहणार आहे. खरंतर या आठवड्याच्या सुरुवातीला या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती काही प्रमाणात वधारल्या होत्या.

Tejas B Shelar
Published:

Gold And Silver Rate : येत्या तीन दिवसात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा संपन्न होणार आहे. गोपाळकाला, जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आणि दहीहंडी म्हणून या सणाला ओळख प्राप्त झाली आहे. हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. यंदाही हा सण त्याचं उत्साहात साजरा होणार आहे. जन्माष्टमीच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा होत असतो.

तसेच, दुसऱ्या दिवशी दहीहंडी याचं नियोजन केले जाते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये दहीहंडीचे उत्साहात साजरा होते. दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी आधीच सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी हाती येत आहे.

ही बातमी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. कारण की सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होती.

आता मात्र याच्या किमतीत घसरण झाली असून ज्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कालावधीत सोने-चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी दिलासादायक राहणार आहे. खरंतर या आठवड्याच्या सुरुवातीला या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती काही प्रमाणात वधारल्या होत्या.

परंतु आठवड्याच्या शेवटी याच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीही सराफा बाजारात सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी जात असाल तर या मौल्यवान धातूंच्या किमती नेमक्या कशा आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

सोने आणि चांदीचे दर कसे आहेत?

सोने आणि चांदी या मौल्यवान धातूच्या किमती आठवड्याच्या शेवटी आणखी वाढतील अशी शक्यता होती. पण आठवड्याच्या शेवटी याच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत.

हे दोन्ही धातू आता स्वस्त झाले असून सोने चांदी खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता फारशी झळ बसणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आता 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.

तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या आठवड्यात चांदी तब्बल 4,000 रुपयांनी महागली होती. पण, या आठवड्यात चांदीच्या किंमती एकदाच वाढल्या होत्या.

इतर दिवशी चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली. 20 ऑगस्टला चांदी 1 हजार रुपयांनी कमी झाली तसेच, 21 आणि 22 ऑगस्टला चांदीचा भाव हा स्थिर होता.

तसेच आज देखील चांदीचे दर कमी होऊन एक किलो चांदीचा भाव 86,700 रुपये असा नमूद करण्यात आला आहे. एकंदरीत आठवड्याच्या शेवटी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe