नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आता पुण्याला जोडला जाणार ! MSRDC चा ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर, कसा असणार प्रकल्प?

हा उड्डाणपूल अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारकडून नुकताच हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. हा उड्डाणपूल पुणे जिल्ह्यातील केसनंद गावामधून सुरु होईल. पुणे-शिरूर-अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने हा नवीन सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती केली जाणार आहे.

Published on -

Samruddhi Mahamarg And Pune Connectivity : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे चार विभाग परस्परांना जोडणारा आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचा द्योतक असणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प आता पुण्याला जोडला जाणार आहे. मुंबई ते नागपूर या दोन शहरांना कनेक्ट करणारा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे.

या महामार्ग प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून जवळपास 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला.

यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. त्यानंतर 2024 मध्ये या प्रकल्पाचा भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.

आता इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या टप्प्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे आणि लवकरच हा उर्वरित महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

दरम्यान हाच समृद्धी महामार्ग आता पुण्याला जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. खरे तर, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे आणि शिरूर दरम्यान एक सहा पदरी उड्डाणपूल तयार केला जाणार आहे.

या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार असून याचा पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. पुणे आणि शिरूर दरम्यान 53 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल तयार होणार आहे.

हा उड्डाणपूल अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारकडून नुकताच हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. हा उड्डाणपूल पुणे जिल्ह्यातील केसनंद गावामधून सुरु होईल.

पुणे-शिरूर-अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने हा नवीन सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. 53 किलोमीटरचा हा उड्डाणमार्ग शिरूरपर्यंत तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 7515 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुण्याला जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नगर मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार असा विश्वास व्यक्त होत आहे.

यामुळे या भागातील वाहतुकीला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे हजारो नागरिकांचा प्रवास सुसाट होईल अशी आशा आहे. यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कधीपर्यंत मार्गे लागणार याकडे पुणेकरांचे विशेष लक्ष लागून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe