Horoscope And Rahu Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर नवग्रहातील ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. शनी, राहू आणि केतू ग्रहांचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते हे विशेष. मात्र जेव्हा केव्हा या तीन ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.
दरम्यान ऑगस्ट महिन्यात राहू ग्रहाने नक्षत्र परिवर्तन केले आहे. 16 ऑगस्ट 2024 ला राहु ग्रह उत्तराभाद्रपदा या नक्षत्रात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या नक्षत्राच्या तृतीयपदामध्ये सध्या राहू ग्रह विराजमान आहेत. डिसेंबर 2024 पर्यंत याच तृतीय पदामध्ये राहू ग्रह विराजित राहणार आहेत. तसेच उत्तराभाद्रपदा या नक्षत्रात राहू ग्रह मार्च 2025 पर्यंत विराजमान राहतील.
यामुळे मार्च 2025 पर्यंत राशीचक्रातील तीन राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांचे जीवनमान पूर्णपणे बदलणार आहे. खऱ्या अर्थाने या राशीच्या लोकांचा आता भाग्योदय होणार आहे. दरम्यान आता आपण राहू ग्रहाच्या या नक्षत्र परिवर्तनाचा कोण कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
वृषभ : राहू ग्रहाचा नक्षत्र परिवर्तनाचा वृषभ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांचा खऱ्या अर्थाने आता भाग्योदय होईल असे म्हटले जात आहे. हे लोक प्रत्येकच क्षेत्रात यशस्वी होणार आहेत. मात्र मेहनतीला शॉर्टकट राहणार नाही.
मेहनत घेतल्यास नक्कीच यश तुमच्या पायाशी लोळण घालणार आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायद्याचा ठरणार आहे. नोकरदार मंडळी या काळात चांगली प्रगती करणार आहेत. राहू ग्रहाच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
आर्थिक दृष्ट्या हा काळ फायद्याचा राहील. परदेशवारीचे देखील योग पूर्ण होतील अशी शक्यता आहे. हे लोक पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहेत. कौटुंबिक जीवन आधीच्या तुलनेत अधिक सुखकर होणार आहे. वैवाहिक जीवनात देखील खूपच आनंद राहील.
कन्या : जर या राशीच्या लोकांचे एखादे काम बिनसले असेल तर ते काम या काळात पूर्ण होईल. तुमच्या जीवनातील बऱ्याचशा अडचणी या काळात दूर होतील. वैवाहिक जीवन देखील सुधारणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला कॉलिटी टाईम स्पेंड करू शकणार आहात.
करिअरसाठी हा काळ फायद्याचा राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना काहीतरी चांगली मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रमोशन आणि पगारवाढीसारख्या घटना देखील या काळात घडतील. मेहनत घेतली तर या काळात नक्कीच चांगले फळ मिळणार आहे.
कुंभ : वृषभ अन कन्या राशि प्रमाणेच कुंभ राशीच्या जातकांचे जीवनमान देखील सुधारणार आहे. या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात धन, धान्याचा लाभ मिळणार आहे. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो आणि गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. आयुष्यातील बऱ्याचश्या अडचणी आता दूर होणार आहेत.
ज्या अडचणी कधीच दूर होणार नाहीत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्या अडचणी सुद्धा या काळात दूर होऊ शकतात. पैशांच्या गुंतवणुकीसाठी हा काळ फायद्याचा राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करणार आहात.