मान्सूनच्या परतीची तारीख ठरली, ‘या’ तारखेला सुरु होणार Monsoon चा परतीचा प्रवास, हवामान खात्याने दिली मोठी माहिती

भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात जारी केलेल्या बुलेटीन मध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत माहिती दिली आहे. IMD ने म्हटल्याप्रमाणे, सामान्यतः नैऋत्य मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होत असतो. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याच्या तळ कोकणात सात जूनच्या सुमारास दाखल होत असतो.

Tejas B Shelar
Published:
Monsoon 2024

Monsoon 2024 : जून ते सप्टेंबर हे मान्सूनचे चार महिने. नैऋत्य मोसमी वारे जून महिन्यात भारतात दाखल होत असतात आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मोसमी वारे भारतातून माघारी फिरत असतात. यावर्षी मान्सून चांगला दमदार राहिला आहे. पण, सप्टेंबर महिना सुरू झाला की मान्सूनच्या परतीचे वेध लागत असते.

मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार आहे? या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने विचारणा केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची थेट तारीखचं जाहीर करून टाकली आहे.

काय म्हणतं भारतीय हवामान खाते ?

भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात जारी केलेल्या बुलेटीन मध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत माहिती दिली आहे. IMD ने म्हटल्याप्रमाणे, सामान्यतः नैऋत्य मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होत असतो.

आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याच्या तळ कोकणात सात जूनच्या सुमारास दाखल होत असतो. राजधानी मुंबईत 11 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होतो. विदर्भात 15 जून नंतर मान्सून तसेच, 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशात दाखल होत असतो.

याच्या परतीच्या प्रवासा बाबत बोलायचं झालं तर मान्सून दरवर्षी 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत भारतातून पूर्णपणे माघारी फिरतो.

यंदा मात्र परतीचा प्रवास १९ सप्टेंबारपासून सुरू होणार आहे. यावर्षी 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. अर्थातच येत्या सहा दिवसांनी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe