Saving Account Rule : तुमचेही देशातील कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर बँकेत विविध प्रकारचे अकाउंट ओपन केले जातात. सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, सॅलरी अकउंट, जनधन बँक अकाउंट असे बँक खात्याचे प्रकार. मात्र सर्वसामान्य नागरिक हे सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते ओपन करतात. तुमचेही देशातील एखाद्या प्रमुख सरकारी किंवा खाजगी बँकेत सेविंग अकाउंट असेलचं.
पण तुम्ही आपल्या सेविंग अकाउंट मध्ये आपण किती पैसे ठेवू शकतो? सेविंग अकाउंट मध्ये जास्तीत जास्त किती पैसे ठेवता येतात याबाबत कधी विचार केला आहे का? नाही ना ! मग आज आपण बँकेच्या सेविंग अकाउंट मध्ये किती पैसे ठेवता येतात या संदर्भात आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे काय नियम आहेत याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Saving Bank Account मध्ये किती पैसे ठेवता येतात?
ग्राहक आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कितीही पैसे ठेऊ शकतात. पण रोखीने पैसे जमा करण्यासाठी RBI चे आणि भारतीय आयकर विभागाचे काही नियम आहेत. आयकर विभागाच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात त्याच्या बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपये रोख ठेवू शकते.
यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली तर बँकांना त्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते. म्हणजे 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तरी काही अडचण येणार नाही पण पैशांची माहिती द्यावी लागणार आहे.
यासोबतच जेव्हा तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक पैसे जमा करता तेव्हा तुम्हाला त्यासोबत पॅन कार्ड सुद्धा दाखवावे लागते.
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एका दिवसात बँक अकाउंट मध्ये किती पैसे जमा केले जाऊ शकतात? तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत रोख जमा करू शकता.
तसेच, जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये नियमितपणे रोख जमा करत नसाल तर ही मर्यादा 2.50 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. एकंदरीत तुम्ही तुमच्या सेविंग बँक अकाउंट मध्ये तुमच्याकडे असणारे सर्व पैसे ठेवू शकतात. यासाठी कोणतीच मर्यादा नाही.
पण सेविंग बँक अकाउंट मध्ये जर तुम्ही एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा केलेत तर तुम्हाला त्या पैशांचे स्त्रोत सांगावे लागणार आहेत, जर तुम्ही आयकर विभागाला ते पैसे कुठून आलेत हे सांगण्यात असमर्थ ठरलात म्हणजे तुम्ही त्या पैशांचा स्रोत सांगू शकला नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. अशा प्रकरणांमध्ये जमा रकमेवर 60 टक्के कर, 25 टक्के अधिभार आणि 4 टक्के उपकर लावला जाऊ शकतो.