घरात साप घुसण्याची भीती वाटते का ? मग ‘ही’ औषधी वनस्पती तुमच्या घरात अवश्य लावा, साप आजूबाजूला पण फिरकणार नाहीत

पावसाळ्यात ठिकठिकाणी पूर येत असतो म्हणून बिळांमध्ये पाणी शिरते. यामुळे सापांसारखे अनेक धोकादायक प्राणी निवारा शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरतात. अनेकदा साप घरांमध्ये सुद्धा प्रवेश करतात. अशा परिस्थितीत साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. इतरही ऋतूंमध्ये सर्पदंशामुळे मृत्यू होतात.

Tejas B Shelar
Published:
Snake Viral News

Snake Viral News : सापाच्या असंख्य जाती आहेत. भारतातही सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात. पण यापैकी 90% जाती बिनविषारी आहे. काही बोटावर मोजण्याइतक्याचं जाती विषारी आहेत. मात्र असे असले तरीही भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. विशेषता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना अधिक घडतं असतात.

पावसाळ्यात ठिकठिकाणी पूर येत असतो म्हणून बिळांमध्ये पाणी शिरते. यामुळे सापांसारखे अनेक धोकादायक प्राणी निवारा शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरतात. अनेकदा साप घरांमध्ये सुद्धा प्रवेश करतात. अशा परिस्थितीत साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात.

इतरही ऋतूंमध्ये सर्पदंशामुळे मृत्यू होतात. त्यामुळे घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात साप निघाला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये, असे करतांना साप चावण्याची भीती अधिक असते. शिवाय साप मारणे हे पूर्णपणे चुकीचे असून यामुळे पर्यावरणाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

म्हणून घरात किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात साप निघाला तर सर्वप्रथम सर्पमित्राला बोलवले पाहिजे, जेणेकरून साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडता येईल.

पण जर तुम्हाला सापांची भीती वाटत असेल आणि साप घरात किंवा घराच्या आजूबाजूला भटकू नये असे वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका झाडाची माहिती देणार आहोत जे झाड घराच्या अंगणात लावल्यास साप आजूबाजूला सुद्धा येणार नाहीत.

या झाडाची लागवड केल्यास साप घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरणार नाहीत

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, सर्पगंधा हे असे एक झाड आहे, ज्याच्यातील प्राकृतिक गुणांमुळे साप त्याच्या जवळ येत नाहीत. सर्पगंधा या वनस्पतीचा वास सापांना अजिबात आवडत नाही. ही एक औषधी वनस्पती आहे. तेव्हा तुम्ही हे झाड अंगणात, बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्याजवळ लावू शकता.

हे झाड घराच्या आजूबाजूला लावले तर सापांची भीती कमी होते. सर्पगंधाचं साइंटिफिक नाव हे सवोल्फिया सर्पेतिना असं आहे. या झाडाचा वास सापांना खूपचं असह्य होत असतो. यामुळे साप हे या झाडांपासून नेहमीच दूर राहतात. केवळ सापाचं नाही तर विषारी प्राणी सुद्धा या झाडापासून दूर राहतात.

सर्पगंधा हे झाड केवळ सापांना दूर ठेवण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा चांगले मानले जाते. ही एक औषधी वनस्पती आहे जी की, उच्च रक्तदाब, निद्रानाश या आजारांवर गुणकारी ठरली आहे. सर्पगंधामुळे कफ आणि वात सुद्धा बरा होतो असा दावा आयुर्वेदात करण्यात आला आहे.

सर्पगंधा या झाडाचं पान आणि साल विंचू आणि कोळीच्या विषाचा परिणाम कमी करण्यासाठी वापरले जाते. फक्त सर्पगंधा नाही तर इतरही अशा काही वनस्पती आहेत ज्यांचा वास सापांना मुळीच आवडत नाही.

सर्पगंधा शिवाय लसूण, मगवॉर्ट, स्नेक प्लांट, तुलसी, प्याज, सोसाइटी गार्लिक, लेमन ग्रास या झाडांचा वास सापांना अजिबात आवडत नाही. ही झाडं अंगणात लावल्यास साप तुमच्या घराच्या आजूबाजूला फिरकणार सुद्धा नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe