Government Decision On Toll Tax : केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठं-मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकरी महिला जेष्ठ नागरिक विद्यार्थी अशा सर्वच घटकातील नागरिकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक कौतुकास्पद निर्णय घेतलेत. दरम्यान मोदी सरकारने नुकताच टोल टॅक्ससंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य वाहनधारकांना, नागरिकांना फायदा होईल असा आशावाद जाणकार लोकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील कोट्यवधी लोकांना होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्ससंदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे.
या नव्या नियमावलीनुसार आता काही लोकांना महामार्गाने प्रवास करताना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. 20 किमीपर्यंत टोल रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना वाहनधारकांना टोल लागणार नाही. अर्थातच टोल प्लाझा पासून जवळ राहणाऱ्या लोकांना सरकारच्या या नव्या निर्णयाचा फायदा होणार आहे.
मात्र या नव्या नियमावलीनुसार सरसकट सर्वच लोकांना टोल माफी मिळणार नाही. तर, त्यासाठी एक महत्त्वाची अट घालून देण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या नव्या नियमानुसार ज्या लोकांच्या वाहनामध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) आहे.
अशा लोकांना 20 किलोमीटर पर्यंत टोल रस्त्यांचा वापर करण्यासाठी टोल टॅक्स भरावा लागणार नाही. महत्त्वाची बाब अशी की हा नियम संपूर्ण देशात लागू झाला आहे.
मात्र जीएनएसएस असणाऱ्या वाहनधारकांनाच हा नवा नियम लागू राहणार आहे आणि याच लोकांना ही सुट मिळणार आहे. राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या सर्वच टोल प्लाजा मध्ये हा निर्णय लागू असेल.
महामार्गावर फक्त 20 किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्या अशा पात्र वाहनधारकांना आता टोल भरावा लागणार नाही तसेच वीस किलोमीटर पेक्षा जास्त टोल रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना त्या अंतराच्या आधारावर टोल द्यावा लागणार आहे.
म्हणजे जे लोक टोल प्लाजाच्या जवळ राहतात आणि ज्यांच्या वाहनांमध्ये ग्लोबल नेविगेशन सॅटेलाइट सिस्टम आहे अशा लोकांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे पैसे वाचणार आहेत.