Onion Rate Ahmednagar : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. राज्यातील नाशिक समवेतच अहिल्या नगर जिल्ह्यात देखील कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड होते. दरम्यान याच अहिल्यानगर जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा झाली आहे. निवडणुकीच्या काळात कांदा बाजार भावात सुधारणा झाली असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होत असून आगामी काळात जेव्हा निवडणुका संपतील तेव्हा कांद्याला काय दर मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा नवीन सरकार राज्यात स्थापित होईल तेव्हा बाजार भाव कसे राहणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काल झालेल्या लिलावात अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान कांद्याला चांगला भाव मिळाला.
येथे गावरान कांद्याला 4800 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. तसेच लाल कांद्याला तीन हजार सहाशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
गावरान कांद्याला काय दर मिळाला ?
मिळालेल्या माहितीनुसार या बाजारात प्रथम प्रतीच्या गावरान कांद्याला ४८०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. दोन नंबरच्या कांद्याला ३६०० ते ४८०० अन तीन नंबरच्या कांद्याला २७०० ते ३६०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
तसेच, चार नंबरच्या कांद्याला या बाजारात १५०० ते २७०० रुपयाचा भाव मिळाला.
लाल कांद्याला काय भाव मिळाला ?
या बाजारात एक नंबरच्या लाल कांद्याला ३६०० ते ४६०० रुपये, दोन नंबरच्या कांद्याला २५०० ते ३६००, तीन नंबरच्या कांद्याला १४०० ते २५०० रुपये अन चार नंबरच्या कांद्याला ५०० ते १४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.