लाडक्या बहिणीने फिरवली महाराष्ट्राची निवडणूक ! महायुतीला बहुमत

महायुतीने हा बहुमताचा आकडा कधीच पार केला असून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. महायुतीला तब्बल 216 जागांवर आघाडी मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष 128 जागांवर, शिवसेना एकनाथ शिंदे गट 49 जागावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 35 जागांवर आघाडी घेऊन आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. 20 तारखेला मतदान पूर्ण झाल्यानंतर नंतर आज 23 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून आता जवळपास चित्र स्पष्ट होत आहे. राज्यात सत्ता स्थापित करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ आवश्यक असते.

मात्र, महायुतीने हा बहुमताचा आकडा कधीच पार केला असून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. महायुतीला तब्बल 216 जागांवर आघाडी मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष 128 जागांवर, शिवसेना एकनाथ शिंदे गट 49 जागावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 35 जागांवर आघाडी घेऊन आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 65 जागांवर आघाडी असून काँग्रेस 18, शिवसेना उद्धव ठाकरे गट 26 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 14 जागांवर आघाडी दाखवत आहे. खरतर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट ठाकरे गट या तीन पक्षांच्या महायुती आघाडीला मोठा फटका बसला होता.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आणि यामुळे ही विधानसभा निवडणूक महायुतीला सोपी जाणार नाही असे म्हटले जात होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्यात.

महिलांना केंद्रस्थानी ठेवून लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना सारख्या महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्यात. दरम्यान याच लाडकी बहीण योजनेने महायुतीला जबरदस्त फायदा मिळवून दिला असून लाडकी बहीण योजनेच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापित होताना दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना पाच महिन्यांचे पैसे देऊ करण्यात आले होते.

जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले होते. नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागणार होती आणि ही आचारसंहिता लक्षात घेऊनच शिंदे सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेत.

दरम्यान याच लाडक्या बहिणींनी यंदाची विधानसभा निवडणूक फिरवली असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडक्या बहिणीचे आभार व्यक्त करत ही योजना विधानसभा निवडणुकीत किती गेम चेंजर ठरली हे अधोरेखित केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe