Personality Test : आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात शेकडो लोकांना भेटतो. आपल्या आजूबाजूला वेगवेगळे लोक राहतात. पण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक बनावट ही वेगळी असते आणि प्रत्येकाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व देखील वेगळे असतं. अनेकदा आपण व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तसेच वागण्यावरून ठरवत असतो.
मात्र अनेकदा व्यक्तीच्या बोलण्यावरून किंवा वागण्यावरून त्याचे खरे व्यक्तिमत्व सिद्ध होत नाही. व्यक्तीचा मूळ स्वभाव नेमका कसा आहे, त्याचे व्यक्तिमत्व नेमके कसे आहे हे वर्षानुवर्षाच्या सहवासातून आपल्याला समजते. पण, व्यक्तीच्या शारीरिक बनावटीवरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? हे ओळखता येऊ शकते.
कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या मनगटावरून देखील त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो. अशा परिस्थितीत आज आपण हाताच्या मनगटावरून व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा आहे? याचा अंदाज कसा बांधला जाऊ शकतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जाड मनगट : काही लोकांचे मनगट जाड असते. जर तुमच्याशी आजूबाजूला अशी व्यक्ती असेल तर समजून जा की या लोकांचा स्वभाव अतिशय आनंदी असतो. हे लोक नेहमी आनंदी असतात आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात.
हे लोक कुठेही जाऊद्यात तेथील वातावरण हे पूर्णपणे चेंज करतात. या लोकांमध्ये असणारी सकारात्मकता ते ज्या ठिकाणी जातात तेथील वातावरणातही दिसून येते आणि अगदीच सकारात्मक वातावरणाची निर्मिती करण्याची एक अद्भुत क्षमता या लोकांमध्ये असते. महत्त्वाची बाब म्हणजे या लोकांच्या स्मित हास्यामध्ये एक विलक्षण जादू असते.
या लोकांच्या स्मित हास्यामुळे इतरांनाही आनंद होतो. हे लोक कधीच कोणावर रागवत नाहीत. कसाही प्रसंग असला तरी देखील हे लोक पॅनिक होत नाहीत आणि संयमाने राहतात. या लोकांना आयुष्य त्यांच्याच पद्धतीने जगायला आवडते. हे लोक टेन्शन फ्री असतात, जास्त ताण घेत नाहीत.
रुंद मनगट : काही लोकांचे मनगट रुंद असते. तुमच्या आजूबाजूला ही असे लोक असतील. असे म्हणतात की ज्या लोकांचे मनगट रुंद असते असे लोक त्यांच्या जीवनात उपस्थित असलेल्या नातेसंबंधांमधून खूप प्रेम मिळवतात. त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, काका, मावशी, काका-काकू त्यांच्यावर खूप प्रेम करतात.
हे लोक स्वाभिमानी असतात आणि त्यांची सर्व कामे दृढनिश्चयाने करतात. परिस्थिती कशीही असली तरी ते विचार न करता कोणताही निर्णय घेत नाहीत. विचार करून अगदीच काळजीपूर्वक निर्णय घेणे हिच या लोकांची एक जमेची बाजू असते आणि यामुळे हे लोक यशस्वी होतात.
पातळ मनगट : काही लोकांचे मनगट हे बारीक असते. तुमच्याही आजूबाजूला असे लोक असतीलच. असं म्हणतात की ज्या लोकांचे मनगट पातळ असते ते खूप भावनिक असतात. कोणताही निर्णय ते भावनेने घेतात.
त्यांना इतरांशी आपुलकी वाटू लागते. मात्र या लोकांच्या याच भावनात्मक स्वभावामुळे त्यांची अनेकदा फसवणूक होते. जर या लोकांनी त्यांचा हा भावनात्मक स्वभाव थोडा सांभाळला तर हे लोकही चांगली प्रगती करू शकतात.