‘या’ 3 वस्तू घरात चुकूनही ठेवू नका; कलह वाढतील, गरिबी येणार ! वास्तुशास्त्राचा हा नियम नेहमी लक्षात ठेवा

वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केले नाही तर घरात गरिबी येण्याची शक्यता असते. दरम्यान आज आपण वास्तुशास्त्रात सांगितलेल्या काही नियमांची माहिती पाहणार आहोत. वास्तुशास्त्रात, अशा 3 वस्तू सांगितल्या गेल्या आहेत ज्या की घरात ठेवणे अशुभ मानले गेले आहे.

Tejas B Shelar
Published:

Vastu Tips : वास्तुशास्त्रात घर कसे बांधले गेले पाहिजे, घरात कोणत्या वस्तू अन कुठे पाहिजेत? या साऱ्या गोष्टींबाबत नियम आहेत. वास्तुशास्त्राच्या या नियमांचे पालन केले तर घराची भरभराट होते. मात्र जर या नियमांचे पालन केले गेले नाही तर मोठ्या प्रमाणात नुकसानही सहन करावे लागते. वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केले नाही तर घरात गरिबी येण्याची शक्यता असते.

दरम्यान आज आपण वास्तुशास्त्रात सांगितलेल्या काही नियमांची माहिती पाहणार आहोत. वास्तुशास्त्रात, अशा 3 वस्तू सांगितल्या गेल्या आहेत ज्या की घरात ठेवणे अशुभ मानले गेले आहे.

घरात या वस्तू ठेवणे अशुभ

जुने फर्निचर : वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरात जुने फर्निचर ठेवू नये. इतरांच्या घरातील फर्निचर जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा त्यासोबत काही नकारात्मक ऊर्जा देखील येण्याची शक्यता असते.

निगेटिव्ह ऊर्जा घरात कलह निर्माण करते आणि यामुळे घरातील वातावरण बिघडते आणि गरिबी येण्याची शक्यता असते. घरात जुने फर्निचर ठेवल्यास अशांतता निर्माण होते असे म्हणतात. त्यामुळे घरात जुने फर्निचर ठेवू नये असा सल्ला वास्तुविशारद लोकांकडून दिला जातो.

जुनी छत्री : दुसऱ्यांचे छत्री घरात आणणे अशुभ मानले गेले आहे. एखाद्या वेळी दुसऱ्याची छत्री वापरली तर काही हरकत नाही. पण, दुसऱ्याची छत्री काम झाल्यानंतर लगेचच परत करावी. दुसऱ्याची छत्री आपल्या घरी आणणे टाळावे.

एखाद्यावेळी नाईलाज म्हणून जर घरात दुसऱ्याचे छत्री आणली गेली तर ती लवकरात लवकर रिटर्न करण्याचे बघावे. जास्त काळ दुसऱ्याची छत्री घरात राहिली तर यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येते आणि याचा तुमच्या घरातील आनंदाच्या वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

दुसऱ्यांचे कपडे : वास्तुशास्त्रात दुसऱ्यांचे कपडे वापरू नये असे म्हटले गेले आहे. वास्तुशास्त्र असे सांगते की दुसऱ्यांचे कपडे वापरायला हरकत नाही मात्र हे दुसऱ्यांनी दिलेले कपडे घरात जास्त दिवस ठेवले नाही पाहिजेत. जर दुसऱ्यांनी दिलेले कपडे घरात जास्त दिवस राहिलेत तर घरात दरिद्री येते.

त्यामुळे दुसऱ्यांचे कपडे जर एखाद्या फंक्शनच्या वेळी तुम्ही आणलेत तर ते लगेच रिटर्न करत जा. अन्यथा तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी येईल आणि यामुळे तुमच्या संसारावर याचा फारच वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरात गरिबी येण्याची शक्यता असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe