400 दिवसांच्या एफडीवर 8.35% व्याजदराने परतावा मिळणार ! ‘ही’ बँक देणार सर्वाधिक व्याज

फेडरल बँकेच्या या नव्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 7.85% आकर्षक व्याजदराचा लाभ मिळेल. महत्वाचे म्हणजे जेष्ठ नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना 0.50% दराने अधिकचे रिटर्न मिळतात. अर्थातच ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायदेशीर आहे.

Tejas B Shelar
Published:

Banking FD News : बँकांमध्ये ठेवींच्या माध्यमातून तुम्हालाही जबरदस्त रिटर्न मिळवायचे आहेत का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी हाती येत आहे. देशातील एका बड्या बँकेने आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन एफडी योजना लॉन्च केली आहे. फेडरल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांची विशेष मुदत ठेव (FD) योजना आणली आहे.

जर तुम्हालाही येत्या काही दिवसात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

फेडरल बँकेची नवीन एफडी योजना कशी आहे?

फेडरल बँकेच्या या नव्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 7.85% आकर्षक व्याजदराचा लाभ मिळेल. महत्वाचे म्हणजे जेष्ठ नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना 0.50% दराने अधिकचे रिटर्न मिळतात. अर्थातच ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायदेशीर आहे. कारण त्यांना अतिरिक्त व्याजदर दिला जातो. चला, आता आपण या एफडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

फेडरल बँकेच्या मुदत ठेवींवरील सुधारित व्याजदर

फेडरल बँक 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.5% ते 7.9% पर्यंत व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना 777 दिवस आणि 50 महिन्यांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक 7.9% व्याज मिळत आहे. अन चारशे दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना तब्बल 7.85% व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना मात्र यामध्ये गुंतवणूक केल्यास 8.35% रिटर्न मिळणार आहेत.

फेडरल बँकेची 400 दिवसांची विशेष एफडी योजना

सामान्य ग्राहकांना किती व्याज मिळते : 7.85%

ज्येष्ठ नागरिकांना किती व्याज मिळते : 8.35% (0.50% अतिरिक्त लाभ)

ही विशेष योजना 400 दिवसांसाठी आहे, जी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.
FD खाते उघडण्यासाठी, ग्राहकांना बँकेच्या अटी व शर्तींनुसार किमान रक्कम जमा करावी लागेल.
मुदतपूर्तीनंतर ग्राहक या एफडीत पुन्हा गुंतवणूक करू शकतात.

ग्राहकांना किती फायदा होईल?

जर एखाद्या ग्राहकाने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 400 दिवसांनंतर त्याला सुमारे 8,500 रुपये परतावा मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 8,950 रुपयांपर्यंत व्याज मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe