लाखात पैसा कमवायचा तर सुरू करा सिक्युरिटी गार्ड एजन्सी! जाणून घ्या कशी आहे संपूर्ण प्रोसेस?

Ahmednagarlive24 office
Published:

Profitable Business Idea:- तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्याकरिता तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर लागणारे भांडवल नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या व्यवसायाच्या शोधात असतात जो अगदी कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो आणि त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवता येऊ शकतो.

या प्रकारचे अनेक व्यवसाय असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रत्येकाला लागणारे भांडवल हे कमी जास्त प्रमाणात वेगवेगळे असते व त्यापासून मिळणारा नफा किंवा पैसा हा देखील कमी जास्त स्वरूपात मिळू शकतो.

त्यामुळे व्यवसायाची निवड करताना संबंधित व्यवसायाची मागणी कशी आहे या पद्धतीने विचार करून जर व्यवसाय निवडला तर नक्कीच फायदा होतो. परंतु नवीनच व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये मात्र व्यवसाय निवडीच्या वेळी बऱ्याच प्रमाणात गोंधळ होतो.

तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे तर या लेखामध्ये अशाच एका व्यवसायाची माहिती दिली आहे जो तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देऊ शकतो व आयुष्यभर तुम्ही हा व्यवसाय चांगल्या प्रकारे सेटअप करू शकतात. कमी खर्चामध्ये तुम्हाला हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देऊ शकतो व हा व्यवसाय म्हणजे सिक्युरिटी गार्ड एजन्सी व्यवसाय होय.

सिक्युरिटी गार्ड एजन्सी व्यवसायातील संधी

आपल्याला माहित आहे की, आता बऱ्याच क्षेत्रांमध्ये सुरक्षा गार्ड म्हणजेच सुरक्षारक्षकांची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या व्यवसायाला सध्या खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येते.

शहरांमध्ये मोठ मोठ्या सोसायटी असो की बँक यामध्ये सुरक्षारक्षक असणे खूप गरजेचे आहे व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांची मागणी मोठी असल्याने हा व्यवसाय खूप फायद्याचा ठरतो.

तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अल्पशा गुंतवणुकीतून तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एका कंपनीची सुरुवात करावी लागते व त्यानंतर ईएसआयसी आणि पीएफ यासारख्या नोंदणी देखील करावे लागतात. त्यासोबतच जीएसटी नोंदणी देखील करावी लागते व कामगार न्यायालयात कंपनीचे नोंदणी करणे देखील महत्त्वाचे असते.

या व्यवसायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये जर बघितले तर तुम्ही पैसा किंवा जागेची कुठल्याही प्रकारची चिंता न करता देखील सुरू करू शकतात किंवा भागीदारीत देखील या व्यवसायाला सुरुवात करणे फायद्याचे ठरते.सध्या मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच शहरांमध्ये उद्योगधंदे देखील मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे ही मागणी डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही सुरक्षा एजन्सी उघडली तर सुरक्षा रक्षकांची वाढती मागणी पूर्ण करून तुम्ही या माध्यमातून लाखोत पैसा मिळवू शकतात.

या व्यवसायासाठी लागणारा आवश्यक परवाना कुठून मिळतो?

यामध्ये खाजगी सुरक्षा एजन्सी नियमन कायदा 2005 अंतर्गत सुरक्षा एजन्सी उघडण्यासाठी परवाना मिळतो यालाच पसारा(PSARA) असे देखील म्हटले जाते. सुरक्षा रक्षक एजन्सी चालवण्यासाठी तुम्हाला हा परवाना लागतोच लागतो.

हा परवाना देण्याअगोदर संबंधित अर्जदाराचे पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण केले जाते व त्यानंतर सुरक्षा एजन्सी उघडण्याकरिता नियुक्त केल्या जाणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या ट्रेनिंग करिता राज्य नियंत्रण प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या संस्थेशी करार करावा लागतो.

सुरक्षा एजन्सी परवाना मिळवण्यासाठी किती लागतो खर्च?

सुरक्षा एजन्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना मिळवण्याकरिता तुम्हाला काही शुल्क भरावे लागते व या शुल्काचे स्वरूप वेगवेगळे असते. समजा तुम्हाला जर फक्त एका जिल्ह्यासाठी सुरक्षा एजन्सीचा परवाना घ्यायचा असेल

तर त्याकरिता पाच हजार रुपये इतके शुल्क तुम्हाला लागते किंवा एका जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांचे सेवा पुरवायची असेल तर दहा हजार रुपये शुल्क भरावे लागते. याशिवाय एका राज्यात जर स्वतःची एजन्सी चालवायची असेल तर मात्र 25 हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते.

तेव्हा तुम्हाला हा परवाना जारी केला जातो.तसेच एजन्सीला महत्वाच्या असलेल्या पसारा या कायद्याच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असते. अशाप्रकारे तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe