पंजाब डख : आज आणि उद्या ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी पाऊस ; पण 25 तारखेपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे सावट

पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे सध्या राज्यात जे हवामान आहे तसेच हवामान आगामी काही दिवस कायम राहणार आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रात प्रामुख्याने ढगाळ हवामान राहील आणि तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात पावसाचे प्रमाण फारच कमी राहणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यानंतर आज राज्यातील हवामानात नाटकीय बदल पाहायला मिळाले आहेत. आज सकाळपासून राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे तर दुपारनंतर राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे.

एवढेच नाही तर राज्यातील काही भागात, तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले असल्याने चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांची या हवामानातील बदलामुळे आणखी चिंता वाढली आहे.

अशातच, आता पंजाब रावांनी एक नवा अंदाज जारी गेला आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे सध्या राज्यात जे हवामान आहे तसेच हवामान आगामी काही दिवस कायम राहणार आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रात प्रामुख्याने ढगाळ हवामान राहील आणि तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात पावसाचे प्रमाण फारच कमी राहणार आहे.

झालाच तर तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पाऊस पडेल असा अंदाज आहे. जवळपास 25 डिसेंबर पर्यंत राज्यात असंच हवामान राहणार असा अंदाज आहे. 25 डिसेंबर पर्यंत राज्यात केवळ ढगाळ हवामान राहील आणि तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण 26 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल दिसणार आहे.

पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान राज्यातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोकण किनारपट्टी, संगमनेर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, कोपरगाव, बीड, परभणी, जालना, सिंदखेड राजा, बुलढाणा, अकोला, हिंगोली, लातूर, नांदेड या भागात भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान 30 तारखे नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान पूर्वपदावर येण्याची शक्यता देखील आहे.

30 डिसेंबर पासून पुन्हा एकदा राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल असा अंदाज पंजाब रावांनी नुकताच जारी केला असून आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान खराब राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी डख यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe