Mahakosh Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालय अंतर्गत 75 रिक्त जागांसाठी भरती सुरू; लवकर अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
MAHAKOSH BHARTI 2024

Mahakosh Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालय अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल गट – क” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज उमेदवारांनी सादर करावा.

Mahakosh Bharti 2024 Details

जाहिरात क्रमांक: सहसंलेवको/पुणे/सरळसेवा भरती/क. ले/10/2024

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.कनिष्ठ लेखापाल गट-क75
एकूण रिक्त जागा75 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • अर्जदार उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 जानेवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गी, आर्थिक दुर्बल घटकातील आणि अनाथ उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज साजरा करावा.

महत्त्वाची सूचना:

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज मध्ये विचारलेले आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी सादर करावा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मुळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (31 डिसेंबर 2024 पासून सुरुवात)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://mahakosh.maharashtra.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe