‘या’ तारखांना जन्मलेले लोक राजासारखे आयुष्य जगतात ! राजासारखी श्रीमंती, मानसन्मान अन स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणून ओळख मिळते

अंकशास्त्र व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याच्या भूतकाळाची भविष्य काळाची आणि वर्तमान काळाची माहिती सांगू शकते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूळांक काढला जातो आणि हाच मुळांक व्यक्तीच्या भविष्याची माहिती देतो. व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरून मूळांक निघत असतो.

Tejas B Shelar
Published:

Numerology Secrets : ज्योतिषशास्त्र अनेक भागांमध्ये विभागले गेले आहे, त्यापैकी एक अंकशास्त्र आहे. अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक भाग असून अंकशास्त्रात अंकांना फार मोठे महत्त्व देण्यात आले आहे. अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे ज्यामध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्व, जीवन आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते.

अंकशास्त्र व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याच्या भूतकाळाची भविष्य काळाची आणि वर्तमान काळाची माहिती सांगू शकते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूळांक काढला जातो आणि हाच मुळांक व्यक्तीच्या भविष्याची माहिती देतो. व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरून मूळांक निघत असतो.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा जन्म हा 11 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुळांक हा 1+1 = 2 असतो. म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असेल त्या सर्व लोकांचा मुलांक हा दोन राहणार आहे.

दरम्यान आज आपण मूळांक तीन असणाऱ्या लोकांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. असे म्हणतात की मुळात तीन ज्या लोकांचा असतो ते लोक अगदी राजासारखे आयुष्य जगतात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मूळांक तीन असणाऱ्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी.

कोणत्या लोकांचा मुळांक तीन असतो

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 3, 12 किंवा 30 तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो त्या लोकांचा मुळांक हा तीन असतो. म्हणजे जानेवारी ते डिसेंबर यापैकी कोणत्याही महिन्याच्या 3, 12 किंवा 30 तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो त्या सर्व लोकांचा मूळांक हा तीन राहणार आहे.

कसा असतो स्वभाव आणि व्यक्तिमत्व

या मूलांकाचे लोक लहानपणापासूनच मेहनती आणि धाडसी असतात. जीवनात आलेल्या कोणत्याही संकटाला ते धीटपणे तोंड देतात आणि हार मानत नाहीत. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ते उच्च पदावर पोहोचतात आणि त्यांना खूप सन्मान मिळतो. हे लोक कठीण परिस्थितीत सुद्धा योग्य निर्णय घेतात.

त्यांना तार्किक गोष्टी आवडतात. तर्क नसलेल्या गोष्टींवर चर्चा करायला त्यांना आवडत नाही. हे लोक बोलण्याआधी फार विचार करतात आणि विचार करूनच बोलतात. बोलण्यानंतर विचार करून पश्चाताप करण्याची सवय या लोकांना नसते. यामुळे या लोकांच्या बोलण्याचा समाजात वेगळा प्रभाव पडतो. हे लोक कुणाच्याच समोर झुकत नाही.

या लोकांना स्वाभिमान खूप प्रिय असतो. हे लोक प्रचंड बुद्धिमान असतात आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात आपला एक वेगळा ओरा तयार करतात. हे लोक फारच क्रिएटिव असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा यांना छंद असतो. हा छंद त्यांना आपल्या जीवनात यशस्वी बनवतो.

दुसऱ्यांना मदत करणारे, परोपकारी स्वभावाचे हे लोक. या लोकांना राजासारखे जीवन जगणे आवडते आणि राजा प्रमाणेच आपले आयुष्य जगतात. हे लोक कमी बोलतात पण योग्य बोलतात आणि यांचा बोलण्याचा समाजातील लोकांवर विशेष प्रभाव पडतो त्यामुळे यांच्या जवळ नेहमीच तुम्हाला लोकांची गर्दी पाहायला मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe